योगेश्वरी शुगरचे तीन लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट
बीड : पाथरी तालुक्यातील योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि.च्या २३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा कार्यकारी संचालक अॅड. रोहित देशमुख आणि त्यांच्या सुविद्य पत्नी उत्कर्षा देशमुख यांच्या हस्ते १६ ऑक्टोबर रोजी विधिवत झाला.
या वेळी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार आर. टी. देशमुख (जिजा), त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. कुंदाताई यांची विशेष उपस्थिती होती, तर संचालक राहुल देशमुख, डॉ अभिजीत देशमुख, सरव्यवस्थापक प्रकाश चांदगुडे यांचीही वेळी उपस्थिती होती.
योगेश्वरी शुगर्सची उभारणी २००१ साली लोकनेते तत्कालीन केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात स्व. अशोकसेठ सामत यांनी केली होती, तेव्हा पासून आजतागायत अखंडपणे उसाचे गाळप हा साखर कारखाना करत ऊस उत्पादक, कामगार, कर्मचारी यांना केंद्रबिंदू मानत आपली वाटचाल सुरू ठेवत, पुढील वर्षी प्रतिदिन् ३५०० मे. टन गाळप क्षमतेने कारखाना चालावा यासाठी व्यवस्थापनाचे प्रयत्न सुरू आहेत, असे चेअरमन आर. टी. देशमुख यावेळी म्हणाले.
गतवर्षी सुमारे तीन लाख टन ऊसगाळप या साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना एकरकमी २७०० रुपये दर दिला होता. या वेळी उसतोडणीसाठी या साखर कारखान्याने चार हार्वेस्टर खरेदी केले असुन, वाहन आणि बैलगाड्यांचेही चोख नियोजन केले असल्याने या हंगामात तीन लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी कारखान्याचे प्रमोटर लक्ष्मीकांतराव घोडे, गंगाधरराव गायकवाड, सुदामराव सपाटे, कारखान्याचे जनरल मॅनेजर प्रकाश चांदगुडे, वर्क्स मॅनेजर श्रीहरी साखरे, चीफ केमिस्ट नवनाथ चौधरी, ऑफिस मॅनेजर राजकुमार तौर, केन मॅनेजर चंद्रकांत मुखरे, डेप्युटी चीफ इंजिनिअर आढाव, चिफ अकौटंट मुकेश रोडगे, कामगार, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड वाहतूक ठेकेदार आदींची उपस्थिती होती.