शून्य टक्के *मिल बंद तास* संकल्पना राबवा : आहेर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नेवासा : तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अधिकारी व कामगारांकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. यावेळी साखर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ वाळू आहेर यांनी मार्गदर्शन केले. कारखान्याची उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी शून्य टक्के ‘मिल बंद तास’ ही संकल्पना राबवणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त साखर उद्योगातील अधिकारी आणि कामगारांसाठी सोमवार दि.२७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात साखर उद्योगातील ख्यातमान तंत्रज्ञ वाळू आहेर यांनी शुन्य टक्के मिल बंद तास व साखर उद्योगातील हाय प्रेशर बॉयलर ऑपरेशन,मेन्टेनन्स आणि सेफ्टी याविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ.पांडुरंग अभंग,संचालक काकासाहेब नरवडे, काकासाहेब शिंदे, शिवाजीराव कोलते, अशोकराव मिसाळ,दादासाहेब गंडाळ,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक रविंद्र मोटे, तांत्रिक सल्लागार एस.डी. चौधरी, एम.एस.मुरकुटे, मुख्य अभियंता राहुल पाटील, कामगार कल्याण अधिकारी बाळासाहेब डोहाळे,कामगार संघटनेचे सचिव संभाजी माळवदे,विलास लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते.

श्री.वाळू आहेर म्हणाले की, हाय प्रेशर बॉयलर ऑपरेशन करतांना उच्च दाब बॉयलर वीज निर्मितीसाठी असतात आणि म्हणूनच कमी प्रमाणात ६०% पेक्षा स्टीम टेम्परेचर खाली जाऊ नये. म्हणून स्टीम टेम्परेचर कंट्रोल ऑपरेटिव्ह असणे आवश्यक आहे. इंधनाची गुणवत्ता आणि प्रमाणात बदल केल्यास फर्नेसच्या तात्पुरत्या स्वरुपात बदल होऊ शकतात आणि प्रेशर आणि स्टीम टेम्परेचर मध्ये चढ-उतार होऊ शकतात.बॉयलरवर एक समान भार आणि कमी तफावतीमुळे चांगले कार्यक्षमता आणि चांगली उर्जा उत्पादन होऊ शकते.जर बॉयलर एका पेक्षा अधिक इंधन व्यवस्थेसह कार्य करत असेल तर सर्वोत्तम शक्य परिणाम मिळविण्यासाठी विशिष्ट इंधनाचा वापर मर्यादित ठेवण्यासाठी डिझाइनरच्या मार्गदर्शकतत्त्वांचे अनुकरण केले जाणे आवश्यक आहे.

सर्व इंधनांसाठी हवा ते इंधन गुणोत्तर अभ्यासणे आवश्यक आहे. बॉयलरची कार्यक्षमता ठरविण्यात अतिरीक्त वायु नियंत्रणाची प्रमुख भूमिका असते.

जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी प्रशिक्षण आणि बॉयलर समजून घेण्याची देखील आवश्यक आहे. ऑपरेटिंग अभियंत्यांना बॉयलरच्या ठळक वैशिष्ट्यांकरिता प्रशिक्षित केले जाणे आवश्यक आहे. वॉटर मॅनेजमेंट, कंडेन्सेट मॅनेजमेंटचा थेट परिणाम स्टीम गुणवत्ता, वीज उत्पादन, इंधन वापर, स्टीम टेम्परेचर, सुपर हीटर्सचे जीवन, टर्बाइन, पाइपिंग इत्यादींवर होतो. म्हणून जास्तीत जास्त फायदे मिळविण्यासाठी या उपकरणांचा अभ्यास करणे आवश्यक आ हे. फॅब्रिकेशनमध्ये एच.पी. वाल्व्हला विशेष प्रकारचे इंटर्नल्स देखील आवश्यक असतात. नेक वेल्ड फ्लॅन्जेस पाइप जोडण्यासाठी वापरतात आणि जोडणाऱ्या पाइपासाठी धातूयुक्त हाय प्रेशर जॉईंटस आवश्यक असतात. फीड वॉटरप्रेशरसाठी मल्टी-स्टेज पंप वापरतात. फर्नेस बॉयलरची हृदय आहेत. हे हाय टेंपरेचरच्या अधीन आहे आणि उष्णतेचे जास्तीत जास्त शोषण करणारे भाग आहेत. कार्यक्षमता आणि ज्वलन पद्धतीवर वारंवार तपासणी आणि सुक्ष्म निरीक्षणे निश्चितच उपयोगी ठरतात. उष्णतेचे जास्तीत जास्त शोषण होण्यासाठी तेजस्वी आणि कंम्बशन झोन मधील सर्व काजळी वाहक ऑपरेटिव्ह असणे आवश्यक आहे.नेहमीच सुट ब्लोईंग मुळे परिणामकारक साफसफाई होऊन अतिरिक्त १% कार्यक्षमता मिळते. वारंवार राख काढून टाकल्यास क्लिंकर तयार होत नाही आणि परिणामी अनबर्नचा होणारी तोटाकमी होईल.

शुन्य टक्के मील बंद तास या संकल्पनेचा आज विचार करण्याची गरज आहे. कारखान्याचे आर्थिक व्यवस्थापन त्यावर अवलंबुन असते. ट्रकमालक, ड्रॉयव्हर ऊसतोड यंत्रणा यावर थेट परिणाम होतो. मील बंद मुळे प्रोसेसमध्ये मालाची प्रत बिघडते. प्रोसेसमध्ये इंटरमिडियट प्रॉडक्टची प्रत वारी बिघडते. परिणामी साखरेची क्वॉलिटी खराब होते. त्यामुळे उत्पादन कमी होते,लॉसेस वाढतात.मोलासेसचे प्रमाण वाढते.

तोडलेल्या ऊसाची प्रत बिघडते. मशिनरी रिपेअरचा खर्च वाढतो. मील बंद पडू नये म्हणून उपाय योजनेवर विचार सुरू होतो. त्यात प्रामुख्याने अनपेक्षित मिल बंद तास, मानवी चुका, मालाची खराबी, संसाधनांचा अतिरिक्त वापर, कामगारांची कार्यक्षमता, आर्थिक पाठबळ यांचा मिल बंद तास काळात अवाजवी वापर करावा लागतो. हे सर्व टाळण्यासाठी शुन्य टक्के मील बंद तास या संकल्पनेचा तांत्रिक आणि शास्त्रीय दृष्टीकोनातुन विचार करण्याची गरज आहे. तो आपण सर्वांनी एकत्र येऊन का करु नये? गरज ही शोधाची जननी आहे. शोधा म्हणजे सापडेल अशी अवस्था आहे. खरं म्हणजे कारखान्यात यावर सखोलपणे अभ्यास झाला पाहिजे.

पाण्याची होणारी गळती,जुने पाईप, व्हॉल, मिटर,पंपाचा वापर, कालबाह्य टेकनॉलाजीचा वापर, प्रोसेसमधील बदलाने पाणी वापरात वाढ, टाक्या ओव्हर फ्लो होणे,मोजमापातील तफावत, वातावरणातील बदलाचे परिणाम यामुळे पाण्याचा जास्त वापर होतो.पाणी वापर कमी झाला तर पंप कमी चालवावा लागून विजेची बचत होते.

कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »