दादा – ताई कलगीतुरा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा थेट सामना अनेकदा पाहायला मिळतो. मात्र, राज्य स्तरावरील या सामन्यांमध्ये देखील स्थानिक पातळीवरच्या मुद्द्यांवरून रंगणारा कलगीतुरा देखील चांगलाच चर्चेत राहातो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि भाजपा नेत्या पंकजा ताई मुंडे यांच्यामध्ये बीडमधील साखर कारखान्यांच्या अवस्थेवरून देखील अशाच प्रकारचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळाला. एकीकडे अजित पवार म्हणतात, “कारखाना चालवण्यासाठी देखील कर्तृत्व असायला लागतं, येड्यागबाळ्याचं काम नाही”, तर दुसरीकडे त्याच्या प्रत्युत्तरादाखल पंकजा मुंडे म्हणतात, “ज्या भागात तुम्ही २५-३० वर्ष नेतृत्व केलं, तिथले देखील राष्ट्रीय महामार्ग आमचंच सरकार आल्यानंतर झाले आहेत”!

बीडमधील राजकारण नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा या दोन पक्षांच्या भोवती फिरत राहिलं आहे. त्यात ऊस उत्पादक शेतकरी आणि मजुरांच्या मोठ्या संख्येमुळे साखर कारखानदारी हा बीडमधील जनता आणि नेतेमंडळी यांच्यासाठी नेहमीच जिव्हाळ्याचा मुद्दा राहिला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »