राजू शेट्टींना ‘काटामारी’चा संशय

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : राज्यातील अनेक साखर कारखाने काटामारी करून शेतकर्‍यांची फसवणूक करत आहेत. काटामारी करून साखरेची चोरी केली जात आहे. जीएसटी न भरता साखरेची परस्परक विक्री होत आहे, त्यामुळे तातडीने साखर कारखान्यांच्या गोडाऊनवर छापे टाकून तपासणी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जीएसटी सहआयुक्त वैशाली काशीद (जीएसटी उपायुक्त कोल्हापूर) यांच्याकडे केली.

शेट्टी म्हणाले कि, राज्यामधील साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा ऊस वजन करत असताना सर्रास काटामारी करतात. एकूण वजनाच्या 10 टक्के इतकी काटामारी केली जाते. हे आमच्या निदर्शनास आले आहे. काटामारीमुळे केवळ शेतकर्‍यांचेच नुकसान होत नसून काटामारीतून उत्पादीत झालेली साखर चोरून विकली जात असल्याने त्यावरील जीएसटी बुडवून शासनाचेही नुकसान होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »