शक्ती शुगर्सची 134 कोटीना विक्री

आवडल्यास ही बातमी शेअर करा

ओरिसातील प्रसिद्ध शक्ती शुगर्स लि. ची अखेर विक्री झाली आहे. चेन्नईच्या इंडियन पोटॅश लि. ने 134.10 कोटी ही मिल विकत घेतली. ढेंकनाल येथे ही मिल आहे.

विक्रीचा व्यवसाय हस्तांतरण करार (BTA) अंमलात आला आहे. मिलचे संपूर्ण दायित्व इंडियन पोटॅशने स्वीकारले आहे.

बीटीएच्या अंमलबजावणी बरोबरच खरेदीदार कंपनी ताबडतोब ढेंकनाल युनिट्सच्या व्यवस्थापन आणि ऑपरेशनमध्ये सहभागी होईल.

व्यवसाय हस्तांतरण कराराची प्रभावी तारीख जुलै 01, 2022 आहे आणि व्यवहाराची अंतिम तारीख, , 30 सप्टेंबर 2022 पूर्वीची असेल.

या कारारानंतर शक्तीचे बीएसईवर प्रति शेअर मूल्य रु. 16.50 वर गेले. सुमारे 5 टक्क्यांची वाढ झाली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »