करवा चौथ व्रत

आज शुक्रवार, ऑक्टोबर १०, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर अश्विन दिनांक १८, शके १९४७
सूर्योदय : ०६:३१ सूर्यास्त : १८:१९
चंद्रोदय : २०:५५ चंद्रास्त : ०९:४३
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : शरद्
चंद्र माह : आश्विन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : चतुर्थी – १९:३८ पर्यंत
नक्षत्र : कृत्तिका – १७:३१ पर्यंत
योग : सिद्धि – १७:४१ पर्यंत
करण : बव – ०९:१४ पर्यंत
द्वितीय करण : बालव – १९:३८ पर्यंत
क्षय करण : कौलव – ०६:०७, ऑक्टोबर ११ पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : वृषभ
राहुकाल : १०:५७ ते १२:२५
गुलिक काल : ०८:०० ते ०९:२८
यमगण्ड : १५:२२ ते १६:५१
अभिजित मुहूर्त : १२:०२ ते १२:४९
दुर्मुहूर्त : ०८:५३ ते ०९:४०
दुर्मुहूर्त१२:४९ ते १३:३६
अमृत काल : १५:२२ ते १६:४८
वर्ज्य : ०६:४७ ते ०८:१२
अमेयाय च हेरम्ब परशुधारकाय ते ।
मूषक वाहनायैव विश्वेशाय नमो नमः ॥
आज संकष्टी (करक ) चतुर्थीआहे.
स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी चतुर्थी म्हणजेच करवा चौथला सूर्योदयापासून चंद्रोदया पर्यंत हे व्रत करतात. करवा चौथ व्रतामध्ये चंद्राची पूजा केली जाते.याला करक चतुर्थी असेही म्हणतात.
या दिवशी महिला त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी कोरडे उपवास करतात आणि रात्री चंद्र पाहिल्यानंतरच उपवास सोडतात. या उपवासात सरगी आणि करवा
चौथ म्हणतात.
आज करवा चौथ व्रत / पूजन आहे.
मानसिक आरोग्य चांगले नसणे म्हणजे केवळ मानसिक अस्वस्थता व तणाव नाही, तर मानसिक आरोग्य चांगले ठेऊन निरोगी राहणे, जीवनातील अडचणींना सामोरे जाणे हे आहे.
आज जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे.
आज जागतिक जागतिक लापशी दिन आहे / जागतिक मृत्यू दंड विरोधी दिन आहे.
आर. के. नारायण आणि मालगुडी हे दोन्ही शब्द समानार्थी म्हणून वापरता येतील.
१९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या.
त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात. या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही, इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे. या गावातीलच एक गोष्ट ‘दि गाईड’ यावर गाईड नावाचा हिन्दी चित्रपट निघाला. दि गाईडचे मराठी रूपांतर श्री.ज. जोशी यांनी केले आहे. आर.के. नारायण यांच्या मिस्टर संपत आणि दि फायनान्शियल एक्सपर्ट या पुस्तकांच्या आधारेही चित्रपट निघाले आहेत. शिवाय त्यांच्या मालगुडी डेज वर आधारित एक दूरदर्शन मालिकाही तयार करण्यात आली होती.
साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियन लेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जाते. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
(नारायण यांचे लहान भाऊ आर.के. लक्ष्मण हे अतिशय प्रसिद्ध व्यंगचित्रकार आहेत. टाइम्स ऑफ इंडिया या दैनिकात लक्ष्मण यांची व्यंगचित्रे “यू सेड इट” या शीर्षकाखाली गेली अनेक वर्षे नियमितपणे प्रसिद्ध होत आली आहेत.)
१९०६: इंग्रजी भाषेतून लेखन करणारे भारतीय लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण यांचा जन्म. (मृत्यू: १३ मे २००१)
मणिलाल नथुभाई त्रिवेदी – गुजराथी साहित्याच्या पंडितयुगातील एक अष्टपैलू लेखक – त्यांचे शिक्षण नडियाद आणि मुंबई येथे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भावनगर येथील शामळदास कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक होते. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी त्यांचे नडियाद येथे निधन झाले.
तथापि ह्या चाळीस वर्षांच्या अल्प आयुर्मर्यादेत त्यांनी गुजराती साहित्याची विविध प्रकारे मौलिक सेवा करून गुजराती साहित्यावर आपला कायम ठसा उमटविला. ते आर्य संस्कृतीचे व शंकराचार्यप्रणीत अद्वैत वेदान्ताचे कडवे पुरस्कर्ते होते. इतर धर्म व संस्कृतींपेक्षा स्वधर्माची व अद्वैतवेदान्त तत्त्वज्ञानाची श्रेष्ठता त्यांनी सतत प्रतिपादन केली. गुजरातीत तसेच इंग्रजीतही त्यांनी विपुल लेखन केले आहे.
कान्ता (१८८२), प्राणविनिमय (१८८८), सिद्धांतसार (१८८९), बाल विलास आत्मनिमज्जन (१८९५), प्रेमजीवन (१८९७), गुलबसिंह (१८९७), सुदर्शन गद्यावलि (१९०९) इ. त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ होत. त्यांनी विविध नियतकालिकांतून धर्म, तत्त्वज्ञान, साहित्य इ. विविध विषयांवर जे अनेक पांडित्यपूर्ण लेख लिहिले, ते सुदर्शन गद्यावलीमध्ये संगृहीत आहेत. इंग्रजीत त्यांनी लिहिलेले प्रमुख ग्रंथ राजयोग (१८८५), मोनिझम ऑर अद्वैतिझम (१८८९), द अद्वैत फिलॉसॉफी ऑफ शंकर (१८९१) हे होत. भारतात तसेच यूरोप – अमेरिकेतही त्यांच्या या इंग्रजी ग्रंथांचे चांगले स्वागत झाले.
ते कुशल संपादक होते. १८८५ मध्ये त्यांनी प्रियंवदा मासिक सुरू केले. त्यात मुख्यत्वे स्त्रीविषयक लेखन प्रसिद्ध होत असे. नंतर त्यांनी सुदर्शन सुरू केले. सुदर्शन मासिकाचे ते १८९० – ९८ पर्यंत संपादक होते. धर्म, समाज, अर्थशास्त्र, राजकारण, समाजसुधारणा, साहित्य, संगीत, शिक्षण इ. विविध विषयांवर त्यांनी या मासिकातून लिहिलेले दर्जेदार लेख त्यांच्या सुदर्शन गद्यावलीमध्ये संगृहीत आहेत. मणिलाल यांच्या विद्वत्तेचा, सखोल चिंतनाचा व चमकदार गद्यशैलीचा उत्कृष्ट परिचय त्यांतून घडतो. सुदर्शन गद्यावलीतील त्यांचे लेख गुजराती गद्याचा उत्कृष्ट व अमोल ठेवा मानले जातात.
१८९८ : मणिलाल नथुभाई त्रिवेदी – गुजराथी साहित्याच्या पंडितयुगातील एक अष्टपैलू लेखक, आर्यसंस्कृतीचे व शंकराचार्यप्रणित अद्वैत वेदांताचे कडवे पुरस्कर्ते (जन्म: २६ सप्टेंबर १८५८)
- घटना :
१८४६: इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन चा शोध लावला.
१९११: चीनमध्ये किंग वंशाचा शेवट.
१९१३: पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले.
१९४२: सोव्हिएत युनियनचे ऑस्ट्रेलिया बरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९४४: दुसरे महायुद्ध – ८०० जिप्सी बालकांना छळ छावणीत ठार केले.
१९५४: श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले.
१९६०: विद्याधर गोखले यांच्या ’सुवर्णतुला’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९६४: जपानमधील टोकियो येथे १८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९७०: फिजीला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.
१९७५: पापुआ न्यू गिनी चा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश केला.
• मृत्यू :
• १९६४: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते गुरू दत्त यांचे निधन. (जन्म: ९ जुलै १९२५)
• १९८३: मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री रुबी मायर्स ऊर्फ सुलोचना यांचे निधन.
• २००५: युगांडा देशाचे राष्ट्राध्यक्ष मिल्टन ओबोटे यांचे निधन.
• २००६: शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे यांचे निधन. (जन्म: ४ ऑक्टोबर १९१३)
• २००८: कथ्थक नर्तिका रोहिणी भाटे यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९२४)
• २०११: गझल गायक जगजित सिंग यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १९४१)
जन्म :
१८४४: रा. काँग्रेसचे ३रे अध्यक्ष बद्रुद्दिन तैय्यबजी यांचा जन्म. . (मृत्यू: १९ ऑगस्ट, १९०६ )
१८९९: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १९९१)
१९०२: कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट निर्माते के. शिवराम कारंथ यांचा जन्म. (मृत्यू: ९ डिसेंबर१९९७)
१९०९: क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९९८)
१९१०: हिंदी-चिनी मैत्रीचे प्रतीक डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म. ( मृत्यू: ९ डिसेंबर, १९४२ )
१९१२: भारतीय कवी आणि समीक्षक राम विलास शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २०००)
१९१६: सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लीला मूळगावकर यांचा जन्म. (मृत्यू: २० मे, १९९२ )
१९५४: चित्रपट अभिनेत्री रेखा यांचा जन्म.