किल्लारी कारखाना : व्यवस्थापन समितीच्या कामाची चौकशी

औसा : तालुक्यातील किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर असलेल्या व्यवस्थापन समितीच्या कार्यकाळातील कामाची चौकशी होणार असून सन २०२० – २१ या काळातील लेखापरीक्षण अहवालात अनेक गंभीर दोष असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या सर्व कारभाराच्या चौकशीचे आदेश नांदेडच्या प्रादेशिक सहसंचालकांनी दिले आहेत.
कारखान्यावर नव्याने आलेले अवसायक पी. आर फडणीस यांनी कारखान्याची सुत्रे हातात घेतल्यापासून अनेकांना धक्का बसला आहे.
मागील व्यावस्थापन समितीच्या काळातील कामाची चौकशी होणार असून तसे आदेश प्रादेशिक सहसंचालक नांदेड यांनी काढले आहेत. यामध्ये सन २०२० – २१ मध्ये झालेल्या लेखापरीक्षण अहवालानुसार चौकशी होणार असल्याचे सांगितले आहे. या लेखापरीक्षण अहवालात अनेक गंभीर दोष असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान दोषीविरुध्द कार्यवाहीही होणार असे फडणीस यांनी स्पष्ट केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.