गाळप हंगामाच्या वेळापत्रकात बदल करण्याची शिफारस
पुणे : ऊस गाळप हंगामाच्या वेळापत्रकात बदल करावा अशी शिफारस साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्य सरकारकडे केली आहे. दरवर्षी साधारणत: 15 ऑक्टोंबरनंतर साखर हंगाम सुरू होतो . यंदा मात्र, 1 ऑक्टोंबरपासून हंगाम सुरु केला तर अतिरिक्त ऊसाचे गाळप रखडणार नाही, असे यं शिफारशीत म्हटल्याचे सूत्रानी सांगितले.
गतवर्षी पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित राज्यातील उसाचे गाळप अटोक्यात आले होते. मात्र, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये हा प्रश्न कायम होता. त्यामुळे जूनपर्यंत या विभागातील साखर कारखाने हे सुरुच होते. जालना, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊस अखेर शिल्लक राहिलाच होता.
शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये आणि ऐनवेळी ऊसतोड कामगारांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदाचा हंगाम 15 दिवस आगोदर सुरु करण्याचा साखर आयुक्तांचा मानस आहे.
शेतकऱ्यांच्या उसाची वेळेत तोड व्हावी यासाठी यंदाच्या हंगामात 400 तोडणी यंत्राचे नियोजन केले जाणार आहे. शिवाय इथेनॉलचे उत्पादन वाढवले तर गाळपावरील ताणही कमी होणार आहे. मात्र, शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्याच्या इतर भागातून कापणी यंत्रे ही तयार ठेवावी लागणार आहेत. त्याअनुशंगाने साखर आयुक्त कार्यालयाचे नियोजन सुरु आहे.
[…] गाळप हंगामाच्या वेळापत्रकात बदल करण्… […]