नितीन गडकरी यांचा साखर कारखानदारीला सावधगिरीचा इशारा

साखर कारखानदारांना राजकारण करायचे आहे. त्यामुळे उसाचे दर काही कमी करता येणार नाहीत. दुसरीकडे साखर जास्त झाली आहे. ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन वाढले तर २० ते २२ रुपयांवर भाव येईल. अशा स्थितीत उसाची लागवड जास्त होत राहिली तर एक दिवस आत्महत्या करावी लागेल, हा माझा शब्द आठवणीत ठेवा, असा सावधगिरीचा इशारा केंद्रीय वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी कारखानदारांना दिला.
सोलापुरातून जाणाऱ्या महामार्गाचे लोकार्पण आणि काही विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम सोमवारी सोलापुरात झाला. या वेळी ते बोलत होते.