फुलपाखरू
मी तर फुलपाखरू
वेलीवरून उडून ॥
जाईन त्या फुलावर
करीन मध प्राशन ॥१॥
चार भिंतीचा निवारा
मानवा सदा आवडे॥
जोखडाचा दोर सदा
गळी अडकून पडे॥२॥
माझीजीवन गाणी
स्वछंदे गाईन रानी ॥
जाई हिरव्या कुरणी
राजाच्या वनभुवनी ॥३॥
तुझी तुला आण भाक
जात पात धर्म पंथाची ॥
मागणी सदा धनाची
चिंता नराला घराची॥४॥
सहज होता हवन
होई परागीभवन॥
खुल्यानिळयाआकाशात
मारता भरारी आम्ही ॥५ ॥
जगेन मी स्वातंत्र्यात
नाही मी पारतंत्र्यात॥
जगा आणि जगून द्या
जगरीत पाळा तुम्ही॥६॥
कवी-वाळू रघुनाथ आहेर
✍️ (बी.ई.एमआयई.बीओई/ -टेक्निकल कन्सल्टंट)