मधुकर साखर कारखाना जळगाव जिल्हा बँकेच्या ताब्यात

जळगाव : यावल– रावेर तालुक्याचा आर्थिक कणा असलेला मधुकर सहकारी साखर कारखाना 57 कोटीच्या थकबाकी पोटी जिल्हा बँकेने सोमवारी ताब्यात घेतला आहे. तत्पूर्वी दोन महिने आधी जिल्हा बँकेने (JDCC Bank) सिक्युरिटायजेशन ॲक्ट अंतर्गत कारखान्याची मालमत्ता जप्तीची नोटीस दिली होती त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
मधुकर साखर कारखाना (Sugar Factory) गेल्या दोन वर्षापासून बंद होता. कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्तावही समोर आला होता. यासाठी दोन वेळा प्रक्रिया राबवूनही त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. या दरम्यान सर्व प्रतिनिधींनी आजी व माजी संचालकांनी संयुक्त बैठक घेऊन जिल्हा बँकेने जप्तीची कारवाई स्थगित ठेवावी; अशी एकमुखी मागणी जिल्हा बँकेकडे केली होती. मात्र त्या मागणीत (Jalgaon News) काही उपयोग झाला नाही.
दोन महिन्यांपुर्वी नोटीस
नोटीस दिल्याप्रमाणे दोन महिन्याचा कालावधी पूर्ण होताच सोमवारी (ता.25) सायंकाळी पाच वाजता जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, महाव्यवस्थापक एम. टी.चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारखान्याची मालमत्ता सील करत जप्तीची कारवाई केली आहे.