महाराष्ट्राला दहा पुरस्कार, शाहू कारखाना देशात सर्वोत्कृष्ट

आवडल्यास ही बातमी शेअर करा

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने (२०२१-२२) च्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. कागलचा श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना देशात सर्वोत्कृष्ट ठरला असून, त्यास वसंतदादा पाटील पारितोषिक जाहीर झाले आहे.

एकूण २१ पुरस्कार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी काल जाहीर केली. या वेळी महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. महाराष्ट्राने दहा पुरस्कारासह प्रथम क्रमांक पटकाविला. दुसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेश व तमिळनाडूला प्रत्येकी तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

गुजरात आणि हरियाणा या राज्यानी प्रत्येकी दोन पारितोषिके मिळविली. तर मध्य प्रदेशाला एक पुरस्कार मिळाला . उच्च साखर उतारा (किमान सरासरी १० टक्के) असणाऱ्या राज्यात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात यातील साखर कारखान्यांचा सहभाग होता.

‘एका कारखान्याला एकच पुरस्कार’ असे धोरण ठरविण्यात आले होते. नवी दिल्ली येथे होणाऱ्या एका विशेष समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

थोरात कारखान्याला उत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला उत्कृष्ट ऊस विकास हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार जाहीर झाला आहे. कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ यांनी दिली.

ओहोळ म्हणाले, माजी मंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने कायम सभासद, ऊस उत्पादक व कामगारांचे हित जोपासताना अन्य कारखाने व सहकारी संस्थांसाठी दिशादर्शक काम केले. कारखान्याने गत हंगामात १५ लाख ५३ हजार मेट्रिक टन विक्रमी गाळप केले.

ऑगस्ट २०२२ मध्ये शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (नवी दिल्ली) या संस्थेचा उत्कृष्ट उद्योजगता पुरस्कार कार्यकारी संचालक जे. बी. घुगरकर यांना प्राप्त झाला आहे.

असे आहेत अन्य पुरस्कार

उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन
(उच्च उतारा विभाग) ः
1. श्री नर्मदा खांड उद्योग, सहकारी मंडली लि. (गुजरात)
2. श्री खेडूत सहकारी खांड उद्योग मंडली लि., बार्डोली (गुजरात)

उर्वरित विभाग ः
प्रथम पारितोषिक : चेंगलारायन को-ऑपरेटिव्ह शुगर मिल्स लि., तमिळनाडू

द्वितीय: दि किसान सहकारी चिनी मिल्स लि. स्नेह रोड, नजीबाबाद (उत्तर प्रदेश)

विक्रमी ऊस गाळप (उच्च उतारा विभाग) ः
विठ्ठलराव शिंदे स.सा.का. पिंपळनेर, माढा, सोलापूर
उर्वरित विभाग
शाहाबाद को-ऑपरेटिव्ह शुगर मिल्स लि., कुरुक्षेत्र (हरियाना)
विक्रमी साखर उतारा (उच्च उतारा विभाग)
डॉ. पतंगराव कदम सोनहिरा, सांगली (महाराष्ट्र)
उर्वरित विभाग
दि किसान सहकारी चिनी मिल्स लि., गजरौला (उत्तर प्रदेश)
विक्रमी साखर निर्यात
प्रथम : श्री दत्त शेतकरी सहकारी कारखाना शिरोळ, कोल्हापूर
द्वितीय ः सह्याद्री स.सा.का. लि., सातारा

अति उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना (उच्च उतारा विभाग)
1. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी कारखाना कुंडल, सांगली (महाराष्ट्र)

2. डी. एस. ८ सुब्रमणिया सीवा को-ऑपरेटिव्ह शुगर मिल्स लि. (तमिळनाडू)

विजेते कारखाने
उत्कृष्ट ऊस उत्पादकता
(उच्च उतारा विभाग)
1. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि. पुणे
2. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, अमृतनगर

उर्वरित विभाग ः
नवलसिंग स.सा.का. मर्यादित, नवल नगर, बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश)
कल्लाकुरीची : को-ऑपरेटिव्ह शुगर मिल्स लि. काचीरायापालयम (तमिळनाडू)

तांत्रिक कार्यक्षमता
(उच्च उतारा विभाग) ः
श्री पांडुरंग लि. सोलापूर
श्री विघ्नहर जुन्नर, पुणे
उर्वरित विभाग ः
दि कर्नाल मिल्स लि. कर्नाल (हरियाना)
दि किसान मिल्स अजमगड
(उत्तर प्रदेश)
Cane Development
(High sugar recovery area):
First prize
Shree Datta Shetkari SSK Ltd,Shirol ,Distt. Kolkhapur,Maharashtra.
Second Prize
Rajarambapu Patil SSK Ltd,Sangli ,Maharashtra .

(Other Sugar Recovery Area) :
First Prize
The Kaithal Coop.Sugar Mills Ltd,Kaithal,Haryana
Second Prize
Kisan Sahakari Chini Mills Ltd,Najibabad , Uttar Pradesh.

Technical Efficiency Award
(High Sugar Recovery Area)
First Prize
Shri Vighnahar SSK Ltd Junnar \Ambegaon,Pune ,Maharashtra
Second Prize
Dr Patangrao Kadam Sonhira SSK Ltd.Sangli ,Maharashtra .
(Other Sugar Recovery Area):
First Prize
The Shahabad Cooperative Sugar Mills Ltd ,Haryana
Second Prize
The Kisan Sahkari Chini Mills Ltd.,Sathiaon ,Azamgarh ,Uttar Pradesh

Financial Management
(High sugar recovery area):
First Prize
Shree Narmada Khand Udyog Shakari Mandli Ltd., Gujarat
Second Prize
Shree Khedut Sahakari Khand Udyog Mandli Ltd.Bardoli ,Gujarat
(Other Sugar Recovery Area):
First Prize
D.S.8,Subramaniya Siva Coop.Sugar Mills Ltd., Tamil Nadu
Second Prize
Shri Navalsingh Sahakari Shakkar Karkhana Maryadit ,Burhanpur ,Madhya Pradesh

Highest Cane Crushing
(High sugar recovery area):
Jawahar Shetkari SSK Ltd., Kolhapur, Maharashtra
(Other Sugar Recovery Area):
Ramala Sahkari Chini Mills Ltd., Uttar Pradesh

Highest Sugar Recovery
Ajinkyatara SSK Ltd., Satara ,Maharashtra
(Other Sugar Recovery Area)
The Kisan Sahakari Chini Mills Ltd.,Gajraula ,Uttar Pradesh
Overall Best Cooperative Sugar Factory
(High sugar recovery area) :
Shri Chhatrapati Shahu SSK Ltd.,Kagal, Kolhapur ,Maharashtra
(Other Sugar Recovery Area):
Kallakurichi-II Cooperative Sugar Mills Ltd, Tamil Nadu

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »