वैद्यनाथची इथेनॉल क्षेत्रात उडी
नागपूर : आता विदर्भात इथेनॉल मोठ्या प्रमाणात निर्मिती होणार आहे. बुटीबोरी, उमरेडसह पाच ठिकाणी इथेनॉल उत्पादन प्रकल्प उभारले जाणार आहेत. प्रसिद्ध आयुर्वेदिक ब्रॅंड वैद्यनाथची इथेनॉल क्षेत्रात उडी. ..
बुटीबोरी अनेक्स, उमरेड, भंडारा, देवरी आणि मूल या पाच एमआयडीसींमध्ये इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प सुरू होण्याच्या दिशेने प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. बैद्यनाथ कंपनी बैद्यनाथ बायो फ्युएल्स या नावाने बुटीबोरीत प्रकल्प उभारणार आहे. सुमारे ४५ एकरमध्ये हा इथेनॉल प्रकल्प होईल. त्यासाठी 485 कोटी गुंतवणूक अपेक्षित आहे.
उमरेडला सुप्रीम इन्फ्राकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड 80 कोटींची गुंतवणूक करून प्रकल्प उभारेल. भंडारा येथे आसगाव अॅग्रो प्रोसेसर 48 कोटी, देवरीला सनफ्लेम इंडिया 300 कोटी आणि मूल एमआयडीसीमध्ये कार्निव्हल इंडस्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड 200 कोटी गुंतवणूक करून, इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारणार आहे.