शाहू कारखाना एकरकमी ३००० देणार, तर दूधगंगा ३२०९ रू.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सुहासिनीदेवी घाटगे
सुहासिनीदेवी घाटगे

कागल : : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२- २३ मध्ये गळीतास येणाऱ्या उसासाठी एकरकमी एफआरपी प्रतिटन तीन हजार रुपये देणार असल्याची माहिती कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांनी दिली.

त्या म्हणाल्या, ‘सहकारातील आदर्श स्व. राजे विक्रमसिंह घाटगे संस्थापक असलेला कारखाना ऊस दराबाबत नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. हंगाम २०२२-२३ साठी कारखान्याने ११ लाख टन गळीताचे उद्दिष्ट निश्चित केले असून ते पूर्ण करण्यासाठी सभासद, ऊस पुरवठादार यांनी नोंद केलेला संपूर्ण ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक डॉ. डी एस पाटील, बॉबी माने, प्रा. सुनील मगदूम, शिवाजीराव पाटील यांच्यासह कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.

K P Patil

दूधगंगा ३२०९ रू. देणार
दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना यंदाच्या गळीतास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन 3209 रुपये दर देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिली. कारखान्याच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत के. पी. पाटील यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, बिद्रीकडून जाहीर करण्यात आलेली ही जिल्ह्यातील उच्चांकी उचल असून यंदाही ऊसदराची परंपरा ‘बिद्री’ने कायम राखल्याचे त्यांनी सांगितले. बिद्री कारखान्याकडून गेल्यावर्षीही एफआरपीनुसार 3056 रुपये दर एकरक्कमी दिला होता.

पाटील यावेळी म्हणाले की, गेली अनेक वर्षे महागाईबरोबर रासायनिक खते,औषधे यांच्या दराचा आलेख वाढत आहे. परिणामी साखरेचा हमीभाव वाढविणे गरजेचे आहे. कारखान्याने खर्चात काटकसरीचे धोरण नेहमीच अवलंबले असून या माध्यमातून शेतकऱ्यांना जादा ऊसदर देण्याची भूमिका कारखान्याने कायम ठेवली आहे. बिद्री साखर कारखान्याने ऊसदरासह तोडणी-वाहतूक, व्यापारी, कर्मचारी यांची देणी वेळेवर देऊन सर्व घटकांमध्ये विश्वास संपादित केला आहे.

आधुनिकीकरणानंतर प्रतिदिन 8 हजार मे. टन क्षमतेने ऊस गाळपासाठी कारखान्याची यंत्रणा सज्ज असून यंदा 12 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले आहे, असे त्यांनी जाहीर केले.

दरम्यान, यापूर्वी हमिदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसासाठी एकरकमी एफआरपी प्रतिटन तीन हजार रुपये देणार असल्याची घोषणा चेअरमन खासदार संजय मंडलिक यांनी दिली पंधरवड्यापूर्वी दिली होती.’
गळीत हंगाम २०२२-२३ साठी कारखान्याने सहा लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »