शेतकरी संघर्ष समिती, किसान सभेची ऊसप्रश्नी औरंगाबादेत निदर्शने
औरंगाबाद : अवकाळी पावसाचे सावट आहे. त्यामुळे ऊस शिल्लक राहिला तर पुढील भरपाईचे धोरण ठरवावे. यासाठी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेने सोमवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर किसान सभेने निदर्शने केली.
निवेदनानुसार, भारतीय किसान सभेने व ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सातत्याने पाठपुरावा करून अतिरिक्त ऊस प्रश्नाचे गांभीर्य राज्य साखर आयुक्त कार्यालयाच्या लक्षात आणून देणाचा ऑक्टोबरपासून कसोशीने प्रयत्न केला. मात्र तेव्हा शासन-प्रशासन स्तरावरून याकडे दुर्लक्ष करून अतिरिक्त उसाची समस्याच नाही एप्रिल अखेर उसाचे एकही टिपरे शिल्लक राहणार नाही, अशी भूमिका पुढे रेटून नेली. त्यामुळे आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली आहे.
दरम्यान अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेनेही आंदोलन केले.
मराठवाड्यात अद्याप शेतात उभा आहे. या संदर्भात सरकार निर्णय घेत नसल्याने शेतकऱ्यांनी दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मैदानात उतरत शिल्लक असलेला उसाचा प्रश्न मार्गा लावा, अन्यथा मंत्रालयात येत आंदोलन करणार असल्याचा इशारा छावा संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला.
या संदर्भात क्रांती चौकातील साखर सहसंचालक कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी जावळे यांनी विविध मागण्याचे निवेदन दिले. श्री. जावळे म्हणाले की, कारखानदारांनी शिल्लक राहिलेला ऊस तोडून न्यावा तसेच तोडणीपासून वंचित असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपये मदत तत्काळ जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.