सौर अग्रहायण

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज गुरुवार, नोव्हेंबर २७, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण (मार्गशीर्ष) ०६, शके १९४७
सूर्योदय : ०६:५३
सूर्यास्त : १७:५९
चंद्रोदय : १२:२०
चंद्रास्त : ००:०१, नोव्हेंबर २८
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : सप्तमी – ००:२९, नोव्हेंबर २८ पर्यंत
नक्षत्र : धनिष्ठा – ०२:३२, नोव्हेंबर २८ पर्यंत
योग : ध्रुव – १२:०९ पर्यंत
करण : गर – १२:२० पर्यंत
द्वितीय करण : वणिज – ००:२९, नोव्हेंबर २८ पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक
चंद्र राशि : मकर – १४:०७ पर्यंत
राहुकाल : १३:४९ ते १५:१३
गुलिक काल : ०९:४० ते ११:०३
यमगण्ड : ०६:५३ ते ०८:१६
अभिजित मुहूर्त : १२:०४ ते १२:४८
दुर्मुहूर्त : १०:३५ ते ११:१९
दुर्मुहूर्त : १५:०२ ते १५:४६
अमृत काल : १५:४२ ते १७:२२

२००८: भारताचे ७ वे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचे निधन. (जन्म: २५ जून १९३१)

नमामो वयं मातृभूः पुण्यभूस्त्वाम्
त्वया वर्धिताः संस्कृतास्त्वत्सुताः
अये वत्सले मग्डले हिन्दुभूमे
स्वयं जीवितान्यर्पयामस्त्वयि ।।१।।

वं. लक्ष्मीबाई केळकर (माहेरच्या कमल दाते) सुरवातीला म. गांधींचा प्रभाव असताना चरखा , सुत कताई इ. कामात केळकर मावशी व्यस्त होत्या. पुढे पतीचे निधन झाल्यांनतर घरातील दोन खोल्या भाडे तत्वावर देऊन आथिर्क समस्या सोडवली. स्वतः ची दोन मुले संघ शाखेशी संपर्क आल्यानंतर संघाची व डॉ हेडगेवार यांचेशी त्यांचा संपर्क आला. मात्र महिला वर्गाला त्या काळी संघात स्थान नसल्यामुळे डॉ हेडगेवार यांचे चर्चा करून व मार्गदर्शनाखाली स्त्री शक्तीला एकत्र आणणे व संघटनेची संकल्पना मांडली. त्यातून पुढे १९३६ मध्ये राष्ट्रसेविका समिती ची स्थापना विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर ( २५ ऑक्टोबर, १९३६ )झाली (रा.स्व.संघाच्या स्त्री-शाखेची). समितीच्या वतीने त्यांनी पाळणाघरे, शिशुमंदिरे, आरोग्य केंद्रे, कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम, इत्यादी उपक्रम सुरू केले. स्त्रियांना उत्तम गृहिणी होण्याचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने मुंबई येथे बकुळ देवकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गृहिणीविद्या नावाने तीन वर्षाचा अभ्यासक्रम सुरू केला.

आगामी दहा वर्षात ह्या संघटनेचे कार्य देशभर विस्तारत गेले. तसेच हे कार्य आज २२हुन अधिक देशात विस्तारले गेले आहे.

• १९७८: भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापक लक्ष्मीबाई केळकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९०५)

चल मरदाने, सीना ताने,
हाथ हिलाते, पाँव बढ़ाते,
मन मुसकाते, गाते गीत।
एक हमारा देश, हमारा
वेश, हमारी कौम, हमारी
मंज़िल, हम किससे भयभीत।

  • – हरिवंश राय बच्चन
    • १९०७: विख्यात हिंदी साहित्यिक पद्मभूषण हरीवंशराय बच्चन यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी , २००३)
  • घटना :
    १८१५: पोलंड राज्याच्या संविधान स्वीकारले गेले.
    १८३९: बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन ची स्थापना.
    १९४४: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात स्फोट होऊन ७० जण ठार झाले.
    १९९५: पाँडेचरीमधील व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर मधील शात्रज्ञांनी शोधलेले थोम्ब्रिनेज हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले.
    १९९५: गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.
    २०१६: निको रोसबर्ग २०१६ फोर्मुला १ चा चाम्पियान बनला.

• मृत्यू :

●१९४१ : श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या कृपा परंपरेतील श्री श्रीस्वामीतनया प. पू .पार्वतीदेवी देशपांडे यांनी देह ठेवला. ( श्री मामासाहेब देशपांडे यांच्या आई )
• १९५२: तत्वचिंतक अहिताग्नी राजवाडे यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर, १८७९)
• १९७६: प्रसिद्ध मराठी पत्रकार. समीक्षक, कादंबरीकार ग. त्र्यं. माडखोलकर तथा गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर, १९००)
• १९९४: स्वातंत्र्यसेनानी, रायगड मिलिटरी स्कूल चे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचे निधन. (जन्म: २८ मे , १९०७ )
• १९९८: प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर यांचे निधन. (जन्म: ४ सप्टेंबर , १९१३ )
• २०००: साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतकचे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर यांचे निधन. (जन्म: २६ मार्च, १९०९)
• २००२: भारतीय कवी आणि शिक्षाविद शिवमंगल सिंग सुमन यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट, १९१५)

  • जन्म :
    १८७०: इतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस यांचा जन्म. ( मृत्यू : ३१ मार्च, १९२६ )

१८७८: भारतीय कवि आणि समीक्षक जतिंद्रमोहन बागची यांचा जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी , १९४७)
१८८१: प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ डॉ. काशीप्रसाद जायस्वाल यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑगस्ट, १९३७)
१८८८: भारतीय लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळणकर यांचा जन्म. ( मृत्यू : २७ फेब्रुवारी, १९५६ )
१९१५: मराठी कथा कादंबरीकार दिगंबर बाळकृष्ण उर्फ दी. बा. मोकाशी यांचा उरण, रायगड येथे जन्म. (मृत्यू: २९ जून, १९८१)
१९५२: भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते बॅप्पी लाहिरी यांचा जन्म

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »