पाटण तालुक्यात तब्बल ७० एकर उसाला भीषण आग

पाटण : तालुक्यातील खिलारवाडी येथील तब्बल ७० एकरातील ऊस भीषण आग लागल्याने खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. या आगीत १९ शेतकऱ्यांचे सात ते आठ लाखांचे नुकसान अतोनात नुकसान झाले आहे. किशोर पवार, तुकाराम पवार, रमेश पवार, सचिन नलावडे, सचिन माने, सुहास नलवडे, बाळासो पवार, बाजीराव पवार, बापूराव पवार, हर्षवर्धन जाधव, सचिन जाधव, आनंदराव जाधव, आप्पासो माने, अरुण पवार, अधिक पवार, वसंत पवार, राजू पवार, राजू मुल्ला, दिगंबर मुळीक अशी पीडित शेतकऱ्यांची नावे आहेत. दरम्यान, शुक्रवारी सकाळपासूनच ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जवळपास सहा तास या आगीचे तांडव सुरू होते. त्यामुळे परिसरातीत वातावरण भयभीत झाले होते. सायंकाळच्या सुमारास उशिरा आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आल्याने पुढील अनर्थ टळला.
सविस्तर वृत्त असे की, वेताळवाडी येथील हनुमान पाणीपुरवठ्याच्या इरिगेशननजीक संबंधित १९ शेतकऱ्यांचा तब्बल ७० एकरावर उस लागवड केलेली आहे. हा ७० एकर क्षेत्रातील उस तोडणीसाठी तयार होता. मात्र, शुक्रवारी अचानक सकाळच्या सुमारास या उसाला आग लागली. यात क्षेत्रावरील पूर्ण ऊस जळून खाक झाला आहे. ही आग मोठ्या प्रमाणावर पसरल्यामुळे परिसरात आगीच्या लोटच्या लोट दिसत होते. यादरम्यान, वाऱ्याचा झोत मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आगीचे रुद्र रूप धारण केले होते. त्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या क्षेत्रावर स्थानिक ग्रामस्थांच्या प्रसंगावधान राखत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते
दिसून येत होते. दरम्यान, लोकनेते बाळासाहेब सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग नलवडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांनी या क्षेत्रात जळालेला ऊस लवकरात लवकर ऊसतोड करून कारखान्याकडे पाठवण्यासाठी टोळ्या मागवल्या असून दोन दिवसांमध्ये संपूर्ण ऊस कारखान्याकडे पाठवला जाणार आहे.






