आजचे पंचांग
आज बुधवार, नोव्हेंबर २०, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक २८, शके १९४६
- आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:४९ सूर्यास्त : १७:५९
चंद्रोदय : २२:२२ चंद्रास्त : ११:१२
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : शरद
चंद्र माह : कार्तिक
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : पञ्चमी – १६:४९ पर्यंत
नक्षत्र : पुनर्वसु – १४:५० पर्यंत
योग : शुभ – १३:०८ पर्यंत
करण : तैतिल – १६:४९ पर्यंत
द्वितीय करण : गर – ०४:४९, नोव्हेंबर २१ पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक
चंद्र राशि : मिथुन – ०८:४७ पर्यंत
राहुकाल : १२:२४ ते १३:४८
गुलिक काल : ११:०० ते १२:२४
यमगण्ड : ०८:१३ ते ०९:३६
अभिजितमुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:०२ ते १२:४६
अमृत काल : १२:२७ ते १४:०२
वर्ज्य : २३:०५ ते ००:४४, नोव्हेंबर २१ - गायिकाहिराबाई बडोदेकर हिराबाईंचा यांच्या घरात तीन पिढ्या संगीताची परंपरा होती. पुण्याच्या हुजूरपागा शाळेत शिक्षण झाले. त्यांना संगीताची लहानपणापासून ओढ होती. त्यांचे मोठे भाऊ प्रसिद्ध गायक सुरेश बाबू माने यांच्याकडेच हिराबाईनी प्रथम संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यांचे गुरु अब्दुल करीम खां यांच्या बरोबर गाण्याची संधीही त्यांना मिळाली.
त्यांच्या मातोश्री ताराबाई यांनी त्यांना जीवनामध्ये पुढे आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्या काळात कुलीन स्त्रिया सार्वजनिक जागी गायन करीत नसत. जात्यावरल्या ओव्या, देवाची भजने, हदगा किंवा मंगळागौर यासारख्या उत्सवात म्हणायची स्त्रीगीते एवढीच त्यांच्या गायनाची मर्यादा होती. दहा लोकांसमोर गाणारी बाई म्हणजे नायकीण असेच समीकरण रूढ होते. त्या नायकिणी उभे राहूनच हावभाव करीत गायच्या व प्रेक्षकांचेही त्यांच्या गायनापेक्षा अदाकारीकडेच अधिक लक्ष असायचे. अशा काळात हिराबाईनी सर्रास संगीत मैफलींमध्ये जाऊन व बसून गायला सुरुवात केली, एवढेच नव्हे तर तिकीट लावून स्वतःच्या गायनाचे प्रयोग केले व शुद्ध शास्त्रीय संगीत ऐकवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संध्याकाळी ८ ला जी मैफिल सुरु होई ती दुसर्या दिवशी पहाटे ४-५ पर्यंत चालत असे. जाणकार रसिक असो की एखादा सामान्य श्रोता असो सर्वजण त्यांच्या स्वरामृतांनी तृप्त होऊन घरी परतत असत.त्यांच्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या व त्या अफाट लोकप्रिय झाल्या.
इ.स. १९२८ मध्ये हिराबाईनी संगीताचे शिक्षण देणारी नूतन संगीत विद्यालय ही संस्था सुरू केली. नूतन संगीत विद्यालयाच्या जोडीने त्यांनी नूतन संगीत नाटक मंडळी ही संस्थाही स्थापन केली. सौभद्र, पुण्यप्रभाव, विद्याहरण, एकच प्याला, युगांतर इ. नाटकांचे त्यांनी प्रयोग केले. उत्तम नाट्यगीतांबरोबर अतिशय परिश्रमपूर्वक त्या अभिनयही करीत. कंपनीला कर्ज झाल्याने हिराबाईनी १९३४ मध्ये नूतन संगीत नाटक मंडळी बंद केली. जनाबाई, सुवर्ण मंदिर, हृदयाची श्रीमंती, प्रतिभा या चित्रपटांतूनही हिराबाईनी कामे केली. त्यांना गायन हिरा, गान कोकिळा या पदव्या मिळाल्या.
इ.स. १९६५ मध्ये त्यांना संगीत नाटक कला अकादमीचा सन्मान प्राप्त झाला तर इ.स. १९७० मध्ये पद्मभूषण सन्मान मिळाला.
• १९८९: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित किरण घराण्याच्या प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांचे निधन. (जन्म: १९ मे , १९०५ )
आज तु धावला नाहीस तर हवेत उडत होतास. म्हणूनच आम्ही तुला फ्लाइंग सिख असा किताब देतो. त्यानंतर मिल्खा यांना द फ्लाइंग सिख असे म्हटले जाऊ लागले – पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती फिल्ड मार्शल अयूब खान
मिल्खा सिंग यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२९ मध्ये गोविंदपुरा पंजाब येथे झाला. ते एका जाट परिवारात जन्माला आले होते. त्यांचे संपूर्ण नाव मिल्खा सिंग लाटीयान असे होते. भारत विभाजनाच्या वेळी आपल्या आई वडिलांना गमावल्यानंतर ते शरणार्थी बनून पाकिस्तानातून भारतात आले.
त्याचवेळी त्यांनी जीवनात काहीतरी चांगले करून दाखवायचे हे मनाशी पक्के ठरविले होते. त्यानंतर पुढे १९५२ मध्ये भारतीय सेनेत विद्युत मॅकेनिकल इंजिनियरिंग शाखेमध्ये शामिल झाले व १९५६ मध्ये ते पटियाला मध्ये झालेल्या राष्ट्रीय खेळांच्या वेळी प्रसिद्धीच्या झोतात आले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो किंवा कोणत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्या काळात मिल्खा सिंग हे क्रीडा विश्वात चांगलेच प्रसिद्ध होते.
मिल्खा यांनी १९५९च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. स्वतंत्र भारताचे हे पहिले सुवर्णपदक होते. त्यानंतर १९६०च्या रोम ऑलिंपिकमध्ये मिल्खा यांचे पदक अगदी किरकोळ अंतराने हुकले. यामुळे ते निराश होते. त्यानंतर १९६० सालीच मिल्खा यांना पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आमंत्रण दिले. मिल्खा यांच्या मनात फाळणीचे दुख: होते. यामुळेच ते या स्पर्धेला जाणार नव्हते. पण तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी समज वल्यानंतर मिल्खा यांनी पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
पाकिस्तानमध्ये तेव्हा अब्दुल खालिक या धावपटूची खुप चर्चा होती. ते पाकिस्तानचे अव्वल धावपटू होते. या स्पर्धेत मिल्खा आणि खालिक यांची रेस झाली आणि त्यात मिल्खा यांनी खालिक यांचा पराभव केला. पाकिस्तानमधील स्टेडियममध्ये सर्व चाहते खालिक यांचा उत्साह वाढवत होते आणि तेव्हा मिल्खा यांनी खालिक यांचा पराभव केला. या विजयानंतर पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती फिल्ड मार्शल अयूब खान यांनी मिल्खा यांना फ्लाइग सिख असे नाव दिले.
त्यांना इ.स.१९५८ मध्ये च्या एशियाई खेळामध्ये २०० मी व ४०० मी मध्ये सुवर्ण पदक., इ.स.१९५८ मध्ये राष्ट्रमंडळ खेळात सुवर्ण पदक., भारत सरकारद्वारे त्यांना १९५९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
इ.स.२०१३ मध्ये प्रसिद्ध निर्माता, निर्देशक व लेखक राकेश ओम प्रकाश मेहरा यांनी मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित ” भाग मिल्खा भाग ” हा चित्रपट बनविला आणि हा चित्रपट खूप चर्चित ही राहिला.
इ.स.२०१७ मध्ये मिल्खा सिंग यांचा लंडन मधील प्रसिद्ध Madame Tussaude येथे मेणाचा पुतळा बनविण्यात आला आहे. मिल्खा सिंग यांच्या ऑटोबायोग्राफीचे नाव “The Race Of My Life” असे आहे.ऑटोबायोग्राफीचे नाव “The Race Of My Life” असे आहे.
असे हे प्रसिद्ध खेळाडू मिल्खा सिंग यांचे १८ जून, २०२१ रोजी चंदीगड येथे कोविड – १९ च्या आजाराने दुःखद निधन झाले.
१९३५: पद्मश्री पुरस्कार सन्मानित १९५८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक विजेते , द फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांचा जन्म. ( मृत्यू : १८ जून , २०२१ )
- घटना :
१७८९: न्यूजर्सी अमेरिकेचे पहिले राज्य बनले.
१८७७: थाॅमस अल्वा एडिसन यांनो ग्रामोफोन चा शोध लावला.
१९१७: युक्रेन प्रजासत्ताक बनले.
१९५९: युनायटेड नेशन्सने बालहक्कांच्या घोषणापत्राची दखल घेतली.
१९८५: मायक्रोसॉफ्ट विंडोज १.० प्रकाशीत झाले.
१९९७: अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली.
१९९८: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित.
१९९९: अनाथ आणि निराधार बालकांच्या संगोपनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा हॅरी होल्ट पुरस्कार लता जोशी यांना जाहीर.
१९९९: आर. जी. जोशी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मोरोपंत पिंगळे यांना जाहीर.
२००८: अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे डाऊ जोन्स निर्देशांक १९९७ पासुनच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.
• मृत्यू :
• १९०८: बंगालमधील सुप्रसिद्ध क्रांतिकारक कन्हय्यालाल दत्त यांना फाशी. (जन्म:३० ऑगस्ट, १८८८)
• १९७०: ख्यातनाम मराठी संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचे निधन. (जन्म: १४ जुलै , १८८४)
• १९७३: पत्रकार व समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर, १८८५)
• १९८४: लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १९११)
• १९९७: स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे स्वीय सहाय्यक शांताराम शिवराम तथा आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.
• १९९८: संस्कृतच्या विविध शास्त्रांतील पंडित, प्रख्यात मीमांसक दत्तात्रेयशास्त्री तांबे गुरूजी यांचे निधन.
• १९९९: तमाशा कलावंत (सोंगाड्या) दत्ता महाडिक पुणेकर यांचे निधन.
- जन्म :
१७५०: म्हैसूर चा राजा शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान यांचा जन्म. (मृत्यू: ४ मे, १७९९)
१८५४: कवी, निबंधकार व नाटकाकर मोरो गणेश लोंढे यांचा जन्म.
१९०५: संसदपटू, अर्थतज्ञ, घटनापंडित मिनोचर रुस्तुम तथा मिनू मसानी यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे , १९९८)
१९२७: न्यायमूर्ती पद्मभूषण चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म. ( मृत्यू:३ जानेवारी, २०१९ )
१९३९: साहित्यिक वसंत पोतदार यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल, २००३ )
१९४१: उर्दू लेखिका हसीना मोईन यांचा जन्म.