स्व. आबासाहेब यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरक : .रविराज देसाई
सातारा :- लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे शिल्पकार व मोरणा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. शिवाजीराव देसाई ऊर्फ आबासाहेब यांचे कार्य सर्वांसाठी सदैव प्रेरणा देत राहील, असे उद्गार मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई (दादा) यांनी काढले.
स्व. आबासाहेब यांची 38 वी पुण्यतिथी मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविराज देसाई होते,
यावेळी ते म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब देसाई मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या राजकरणात कार्यरत असताना आपल्या उद्योजक असणाऱ्या सुपुत्रास गावाकडे पाठवून मरळीच्या माळरानावर साखर कारखाना उभारण्याची जबाबदारी दिली, परंतु त्यांनी त्यावेळी वडीलाचा शब्द शिरोधार्य मानून सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली, त्याच बरोबर मोरणा शिक्षण संस्थेची स्थापना करून पहिले माध्यमिक विद्यालय सोनवडे या ठिकाणी सुरू केले, आज आबासाहेबानी लावलेल्या शिक्षणरुपी रोपट्याचा आज वटवृक्ष होतोय यांचा मला अभिमान वाटतो, अल्पायुष्य मिळालेल्या आयुष्यामध्ये स्व.आबासाहेब कार्य खूप प्रेरणादायी आहे.
या कार्यक्रमादरम्यान पाटणचे प्रांताधिकारी सुनिल गाढे, तसेच तहसीलदार अनंत गुरव , अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री.ठाकूर यांनी आपल्या मनोगतातून स्व.शिवाजीराव देसाई यांच्या कार्याबद्दल व स्मृतीबद्दल आदर व्यक्त केला.
यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते विद्यालयातील गरीब ,गरजू. हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश वाटप करण्यात आले, तसेच विद्यालयाच्या परिसरामध्ये 501 रोपाचे वृक्षारोपण करण्याचा शुभारंभ प्रमुख पाहुणे व मान्यवर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला,
या कार्यक्रमासाठी मोरणा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री.विलास कुऱ्हाडे, सचिव श्री डी.एम.शेजवळ, बाळासाहेब फौंडेशनचे सचिव श्री.एन.एस.कुंभार एस.आय मुजावर, व्ही.जे.पाटील, प्रकाश शेजवळ, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग त्याचप्रमाणे सोनवडे, सुळेवाडी, शिंदेवाडी गावचे सरपंच ग्रामस्थ,आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पी.एल. केंडे यांनी केले, तर आभार श्री.संतोष कदम यांनी मानले.