शुगर टुडे

पत्रकारितेच्या क्षेत्रात विविध भूमिकांमध्ये तब्बल ३० वर्षे काम करणारे महनीय पत्रकार, संपादक नंदकुमार सुतार यांच्या संकल्पनेतून SUGAR TODAY (शुगर टुडे) हे डिजिटल आणि प्रिंट क्षेत्रात साकारत आहे.

साखर क्षेत्रासह अनेक उद्योग क्षेत्रांची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. त्याबाबत संबंधित घटक आणि वाचकांना माहिती हवी असते; मात्र ‘मेन स्ट्रीम’ किंवा मुख्य प्रवाहातील माध्यमांना त्यांच्या अंगभूत मर्यादांमुळे, अशा क्षेत्रांना न्याय देता येत नाही. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये, अशा क्षेत्रांना नव्या माध्यमांद्वारे व्यासपीठ मिळत आहे.

साखर आणि सहकार या क्षेत्रांतील सर्व संबंधित घटकांच्या प्रतिनिधींशी सखोल चर्चा केल्यानंतर ‘शुगर टुडे’चा जन्म झाला.

हे माध्यम आधुनिक काळातील सर्व प्रकारच्या प्रसिद्धी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आले आहे. शिवाय पारंपरिक छापील माध्यम अवतारातही ते मासिकाच्या स्वरूपात प्रसिद्ध होणार आहेच.
‘शुगर टुडे’च्या माध्यमातून साखर आणि सहकार क्षेत्रांतील सर्व घडमोडी संबंधित घटक आणि सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. विशेषत: साखर क्षेत्रातील घडामोडी प्राधान्याने संकलित करून, प्रसिद्ध केल्या जातील. त्यात खासगी आणि सहकारी साखर कारखानादारीतील यशस्वी प्रयोग, साखर तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडी, बाजार वृत्त, विदेशी साखर उद्योग आदी सर्व बाबींचा अंतर्भाव असेल.
माध्यम जगतातील हे नवे पाऊल अधिक लोकाभिमुख आणि मजबूत होण्यासाठी आपल्या सूचना आणि सल्ल्यांचे नेहमीच स्वागत राहील. त्यासाठी ईमेल पत्ता :

contact@sugartoday.in

तज्ज्ञ मागदर्शक मंडळ
(संक्षिप्त परिचय)

प्रमुख मार्गदर्शक

डॉ. बुधाजीराव मुळीक

शेती आणि शेतकऱ्यांना समर्पित व्यक्तिमत्त्व.
कृषिभूषण आणि कृषिरत्न या महाराष्ट्र शासनाच्या कृषी क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित. अमेरिकेतील यूटाह विद्यापीठातून पीएच. डी. कृषी पदव्युत्तर पदवीसोबतच, कृषी अभियांत्रिकीची पदवी. चाळीसहून अधिक देशांचे अभ्यास दौरे. आफ्रिकी देशांचे माजी कृषी सल्लागार. कोल्हापूर, राहुरी, पुणे येथे तीस वर्षे अध्यापन.
एक्झिम बँकेसह विविध सरकारी आणि प्रतिथयश खासगी संस्थांवर संचालक, मार्गदर्शक, सल्लागार.
राज्यपालांचे माजी सल्लागार. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळावर राज्यपाल नियुक्त सदस्य.

भूमाता संस्थेचे संस्थापक इ.

Dr. Yogendra Nerkar

मार्गदर्शक

डॉ. योगेंद्र नेरकर

माजी कुलगुरू, संकरित वाण संशोधन क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ

१९६४ मध्ये पुणे विद्यापीठातून बी.एस्सी. (कृषी) पदवी विशेष प्रावीण्यासह .

१९६६ मध्ये नवी दिल्ली येथील भा.कृ.अ.सं.तून पदव्युत्तर पदवी विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत आणि याच संस्थेतून उत्पत्तिशास्त्र विषयात पीएच.डी. ही पदवी १९७० मध्ये.

१९९६ ते १९९९ – म. फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू.. भारत सरकारच्या पंचवार्षिक ऊस संशोधन मूल्यमापन समितीचे अध्यक्ष.

डॉ. बाळकृष्ण जमदग्नी

नामवंत ऊस संशोधक

राष्ट्रीय ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथील निवृत्त ऊस संशोधक. अनेक संकरित जातींचे संशोधन,

ऊस शेतीचे परिवर्तन करणारे शास्त्रज्ञ.

‘ऊस संजीवनी’ या पुस्तकाचे लेखक.

ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी एकरी शंभर टनांपर्यंत ऊस उत्पादन घेतले, आजही घेत आहेत.

डॉ. सुरेशराव पवार

नामवंत ऊस संशोधक

ऊस संशोधन क्षेत्रातील तब्बल तीन तपांचा अनुभव.

राष्ट्रीय ऊस संशोधन केंद्र, पाडेगावचे निवृत्त मुख्य संशोधक. बावीसहून अधिक ऊस जातींचे संशोधन, त्यांनी तयार केलेल्या ऊस प्रजातींचे महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्र.

‘रसवंत’ आत्मचरित्र प्रसिद्ध.

साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापकीय संचालक निवड समितीवर निमंत्रित सदस्य.  

Dr. Santosh Taware

डॉ. संतोष तावरे

नामवंत तरुण संशोधक

प्लँट ब्रीडिंगमध्ये डबल पीएच. डी. पहिली अमेरिकेत, दुसरी पुण्यात.

तीसहून अधिक वाणांचे पेटंट.

विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बीज उत्पादन आणि संशोधन कंपन्यांमध्ये कार्य. सिमेनॅक सीड्‌सचे प्रवर्तक.

2३ देशांमध्ये कार्य

Select Language »