मामांवर आबा पडले भारी; ‘आदिनाथ’वर निर्विवाद वर्चस्व

सोलापूर : करमाळा येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या ‘आदिनाथ संजीवनी पॅनल’ला स्पष्ट बहुमत मिळाले असून सर्वच्या सर्व २१ जागांवर त्यांनी निर्विवाद विजय मिळवलेला आहे.
माजी आमदार संजयमामा शिंदे, प्रा. रामदास झोळ यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढविली. शिंदे आणि प्रा. झोळ यांच्यासह त्यांच्या संपूर्ण पॅनलचा पराभव झाला आहे. मामांवर आबा भारी पडले आहेत.
‘आदिनाथ’ च्या संचालक मंडळ निवडणुकीत १७,६५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. २१ संचालक निवडण्यात आले असून यामध्ये जेऊर, सालसे पोमलवाडी, केम आणि रावगाव या पाच उत्पादक गटातून प्रत्येकी तीन याप्रमाणे १५ संचालक तर उत्पादक सहकारी संस्था, बिगर ऊस उत्पादक सहकारी संस्थांमधून एक, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातून एक, महिला राखीव गटातून दोन, इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी गटातून एक, भटके विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी गटातून एक असे २१ संचालक आ. नारायण पाटील गटाचे निवडून आले आहेत.
जेऊर गट आ. पाटील गटाचे श्रीमान चौधरी (८०६१ मते), महादेव पोरे (८१९५ मते), दत्तात्रय गव्हाणे (८६०७ मते) हे विजयी झाले.
संजयमामा शिदे गटाचे चंद्रकांत सरडे (६८४६ मते), प्रमोद बदे (६८११), प्रशांत पाटील (६८९७), प्रा. झोळ गटाचे रवींद्र गोडगे (८२०), दत्तात्रय कामटे (८५९), शांतीलाल जाधव(८४८) पराभूत झाले.
पोमलवाडी गटातून आ. पाटील गटाचे किरण कवडे (८५७१), नवनाथ झोळ (८३४३), संतोष पाटील (८३२८) हे विजयी झाले. तर शिंदे गटाचे दशरथ पाटील (६७०१), बबन जाधव (६८३७), नितीन राजे भोसले (६७०८), प्रा. झोळ गटाचे रामदास झोळ (१९३७), भरत जगताप (७६६), प्रकाश गिरंजे (७६५) हे पराभूत झाले.
सालसे ऊस उत्पादक गटातून आ. पाटील गटाचे रविकिरण फुके (८२३२), दशरथ हजारे (७९३३), आबासाहेब अंबारे (८४७९) हे विजयी झाले तर शिंदे गटाचे विलास जगदाळे (६८०५), नागनाथ चिवटे (७०३९), नवनाथ जगदाळे (६८०४), प्रा.झोळ गटाचे अण्णासाहेब देवकर (८५८), भरत सरडे (८१३), जगदाळे दत्तात्रय (८८२) हे पराभूत झाले.
केम गटातून आ. पाटील गटाचे दत्तात्रय देशमुख (८६२५), महेंद्र पाटील (८३३७), विजय नवले (८१०६) हे विजयी झाले तर संजयमामा शिवे (७०६०), सोमनाथ देशमुख (६७२८), सोमनाथ रोकडे (६७७९), प्रा. झोळ गटातून सुधीर साळुंखे (८२४), बापूराव तळेकर (९९७) हे पराभूत झाले. रावगाव गटातून आ.पाटील गटाचे अमोल घाडगे (८५७५), देवानंद बागल (८०९२), राहुल सावंत (८०३६) हे विजयी झाले. शिये गटाचे आशिष गायकवाड (६८४८) अभिजित जाधव-पाटील (७०५३), विनय ननवरे (६६५४), प्रा. झोळ गटाचे हरिभाऊ झिंजाडे (९११), कल्याण पाटील (९७९), सुभाष शिंदे (७८४) हे पराभूत झाले.
तसेच भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी गटातून आमदार नारायण पाटील हे स्वतः विजयी झाले आहेत. त्यांना ९४६२ मते मिळाली. तर विरोधी शिंदे गटाचे अनिल केकान (६८७९), प्रा. झोळ गटाचे रायचंद्र खाडे (८७१) पराभूत झाले.
महिला राखीव प्रतिनिधी गटातून आ. पाटील गटाच्या राधिका भीमराव तळेकर (८५३७) आणि उर्मिला हनुमंत सरडे (८३८३) या विजयी झाल्या तर शिंदे गटाकडून गुंडगिरे शालन मनोहर (७०७३), सरडे मंगा तात्याबा (६८७४) आणि प्रा. ओळ गटाकडून नाईकनवरे इंदुबाई आजिनाथ (७९४), मंगवडे रत्नमाला ज्ञानदेव (७६२) या पराभूत झाल्या. उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था पणन संस्था प्रतिनिधी गटातून आ. पाटील गटाचे हरिदास केवारे (२०९) हे विजयी झाले तर शिये गटाचे सुजित बागल (१२७) व झोळ गटाचे दशरथ कांबळे (५) पराभूत झाले.
इतर मागासवर्गीय जातीचा प्रतिनिधी गटातून आ. पाटील गटाचे दादासाहेब पाटील (९१२९) हे विजयी झाले तर रविंद्र गोडगे (९५०) आणि रोहिदास माळी (७१४६) हे पराभूत झाले. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिनिधी गटातून आ.पाटील गटाचे राजेंद्र कदम (८८०६) विजयी झाले तर शिंदे गटाचे सोनवणे बाळकृष्ण (७२२६), प्रा. झोळ गटाचे दशरथ कांबळे (१०९४) हे पराभूत झाले.

विजयानंतर आमदार नारायण पाटील समर्थकांनी मोठा जल्लोष केला. ‘आदिनाथ’ कारखान्याच्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. निवडणूक निर्णय अधिकारी अमोलसिंह भोसले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठीकडे, रतन बोलवाडे यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली ही मतमोजणी अतिशय शांतपणे व सुरळीत पार पडली. यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत मिळालेला विजय म्हणजे सभासदांनी दाखवलेला विश्वास असून यास पात्र राहून आदिनाथ कारखान्यास उर्जीत अवस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करणार, एक शिवधनुष्य पेलण्यासाठी सभासदांनी दिलेली मतरुपी ताकद उर्जेचा स्रोत आहे. लवकरच कारखान्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन पुढील नियोजन हाती घेणार आहोत, तालुक्यातील सहकार टिकवताना भांडवलदारांच्या पाठीमागे न उभारता शेतकऱ्यांच्या मुलांच्या पाठीशी मतदार उभा राहीले याबद्दल आभार व्यक्त करतो, असे उद्गार आ. पाटील यांनी काढले.