बकध्यान

या बगळ्यांनो लवकर परत फिरा रे|
तळ्याकडे आपुल्या ,लगबगीने निघा रे||
प्रभात झाली,बकध्यानाचा समय झाला||१||
दहा दिशांनी येईल आता माशांचा पूर |
अशावेळी नका राहू तळ्यापासून दूर||
ससाणा घिरट्याघाली,जीवचिंतीत झाला|२||
इथे जवळ डबक्यात आहो आम्ही आई |
आता इकडे माशांचा दिवस सुरु होई||
जाळ्यासह कोळीतळ्यात कुठे उतरला||३||
तुम्ही असल्या बिगर अवतीभवतीला |
उरक येईना आमुच्याही मासेमारीला||
या बलाकांनो या,लवकर बकध्यानाला||४||
आहेर वाळू रघुनाथ, नाशिक