बारा ज्योतिर्लिंग आरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

ओम नमोजी त्र्यंबकेश्वरा
गौतमीतटवासी शंकरा
वेरूळच्या देवा घृष्णेश्वरा
आरती करु भोळ्या शंकरा||१||


दारुकावनीच्या नागेश्वरा
वाराणसीच्या तु विश्वेश्वरा
नमन तुजला गौरीहरा
आरती करु भोळ्या शंकरा||२||


नमितो तुज ओंकारेश्वरा
सेतूबंधे तु  श्रीरामेश्वरा
श्रीरामे विराजिले ईश्वरा
आरती करु भोळ्या शंकरा||३||


हिमालये तु केदारेश्वरा
उज्जैनीच्या महांकालेश्वरा
चरणी दंडवत स्वीकारा
आरती करु भोळ्या शंकरा||४||


परळी वैजनाथा ईश्वरा
सौराष्ट्र किनारी सोमेश्वरा
चरणी मस्तक हरीहरा
आरती करु भोळ्या शंकरा||५||


श्रीशैलवासी मल्लिकार्जुना
नेपाळच्या पशुपतेश्वरा
ज्योतिर्लिंग वासी गौरीहरा
आरती करु भोळ्या शंकरा||६||

|| रघुनाथनंदन ||

नाशिक

(साखर उद्योग क्षेत्रात चांगले साहित्यिक, लेखक आहेत. त्यांच्या लेख आणि कवितांचे स्वागत आहे. शुगरटुडे मध्ये आपले साहित्य प्रसिद्ध केले जाईल . whatsapp no. 8999776721 )

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »