पैसापुराण

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कठीण समयास कोण करी काम|
येईल का धावून भगवान राम||
दाम करी काम बीबी करी सलाम |
दामुजीला सर्व करती रामराम ||१||

कुबेर नगरी पुण्यभूमी पवित्र |
तेथे नांदतोय धनराजा सुपुत्र||
तयास आठविता महापुण्यराशी |
नमस्कार माझा त्याश्री धनराजाशी||२||

जगी सर्व सुखी असा कोण आहे |
विचारी मना तूच शोधून पाहे||
बाकी सर्व प्रवाहपतित आहे |
रूपया शिवाय कोण मोठं आहे ||३||

ना नेता ना ईश्वर ना संत |
तोच मोठा ज्याची आहे पत ||
करा दंगा, काढा कुरापत |
कायदा पडेल खितपत ||४||

पैसा फेकून बघत बसा तमाशा |
करतो दारू गांजा चरसची नशा ||
फेका पैसा न सजा करा बदमाशा|
पैसे नसतील ना तर मारा माशा ||५||

म्हणती पैशापुढे सारे लहान |
खरंच का पैसा हाच भगवान ||
कंगालाचा पैशातच आहे प्राण |
पैशाने देवादारी मिळतो मान||६||

आमदणी अठ्ठणी खर्चा रुपया,|
कोणीही असं करु नका कृपया ||
तेव्हा वापरा पैसा काटकसरीनं |
इति सकल पैसा पुराण संपन्न ||७||

रचनाकार: आहेर वाळू रघुनाथ नाशिक
(बीई एमआयई बीओई)९९५८७८२९८२

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »