॥ तेव्हाही झाडाला आनंद झाला ॥

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पोपट आणि मैना झाडावर बसले
दोघेही गाणे गात डोलू लागले
तेव्हाही झाडाला आनंद झाला ॥१॥

एवढ्यात झाडापाशी सुगरण आली
सुगरणीने झाडावर घरटे बांधले
तेव्हाही झाडाला आनंद झाला॥२॥

रात्री झाली तेव्हा चंद्रकोर आली
झाडाआडून जगाशी लपंडाव खेळली
तेव्हाही झाडाला आनंद झाला ॥३॥

दिवसा रविदादा आले आणि तापले
माणसे जनावरे झाडाच्या सावलीत आली
तेव्हाही झाडाला आनंद झाला ॥४॥

आभाळात ढग दाटुन आले
पावसात वीज झाडापाशी भूमीला भेटली
तेव्हाही झाडाला आनंद झाला॥५॥

दोन तीन मुले धावत आली
काही फळे खाऊन आनंदली
तेव्हाही झाडाला आनंद झाला॥६॥

दोन आदिवासीं झाडापाशी आले
शुष्क फांद्याची मोळी घेऊन गेले
तेव्हाही झाडाला आनंद झाला ॥७॥

झाडाने देवाची प्रार्थना केली
हेचि काम करा आकाशवाणी झाली
तेव्हाही झाडाला आनंद झाला॥८॥

ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी
ऐकले कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
तेव्हाही झाडाला आनंद झाला॥९ ॥

रचनाकार:

आहेर वा.र., नासिक

बी.ई.एमआयई.बीओई
९९५८७८२९८२

कवी साखर उद्योग क्षेत्रातील नामवंत सल्लागार आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »