॥आपुला भारत देश महान ॥

आवडल्यास ही बातमी शेअर करा

इथे वाहति गंगा-यमुना, सिंधु, कावेरी।
तापी, नर्मदा, कृष्णा, गोदावरी ॥
हा नंगा, हा धवलगिरी।
हा अरवली, हा सह्यगिरी ॥१॥


गारो खासी, हा निलगिरी।
हिंदुकुश. काराकोरम. असे उत्तरी ॥
आयोध्या, काशी, मथुरा, कांची पुरी।
अवंति, उज्जैन या वसति सप्तपुरी॥२॥


नवी क्षेत्रे इथे वसति चांदीपुर ।
कल्पाकम, पोखरण, तारापुर ॥
इथे नाग, त्रिशूल, चांद्रयान ।
ब्राम्होस, पिनाक, मंगळयान॥३॥


इथेच अहिल्या, सीता. तारामती।
चावला, फोगाट, सुधा मूर्ती ॥
इथलेच व्यास, कणाद, रामानुजम।
साराभाई, काकोडकर, कलाम॥४॥


बासमती हळदीचे पेटेंट जहाले ।
त्यासाठी माशेलकर लढले ॥
शास्त्रींची मुर्ति होती लहान ।
परि किर्ती त्यांची महान ॥५॥


संविधान ही आपली शान।
आपुले राष्ट्रगीत जनगणमन
आपण ठेवू या तयाचा मान
आपुला भारत देश महान ॥६॥


रचनाकार: आहेर वा.र.नासिक
बी.ई.एमआयई.बीओ

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »