आजरा साखर कारखान्याची निवडणूक लांबली
कोल्हापूर : आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पावसाळ्यात संभाव्य पावसाचा धोका ओळखून निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी केली होती. त्यानुसार सहकार निवडणूक प्राधिकरणाने कारखान्याची निवडणूक ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
संचालक मंडळाची मुदत मे २०२१ मध्येच संपली आहे. कोरोना व अन्य कारणामुळे आधी निवडणूक लांबली होती. न्यायालयाने राज्य सरकारला सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० जून २०२३ पूर्वी घेण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली होती. २५ मे २०२३ रोजी पक्की मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.