आंदोलन अंकुशची 9 नोव्हेंबरला एल्गार सभा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : ऊस दराच्या प्रश्नावर आंदोलन अंकुश संघटनेची यावर्षीची एल्गार सभा 9 नोव्हेंबर रोजी शिरोळच्या छत्रपती शिवाजी चौकात होणार आहे.

आंदोलन अंकुशच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवून ते प्रश्न सरकार दरबारी व प्रसंगी कोर्टात मांडून ते मुळापासून सोडवणे हा आमच्या संघटनेचा नेहमीच प्रयत्न असतो, त्याचबरोबर उसाला दुसरा हप्ता 500 रुपये मिळावा व येत्या हंगामात पहिली उचल एकरकमी 3500 मिळावी ही मागणी आम्ही गेली 4 महिने लावून धरली आहे, पण कारखाने जुमानायला तयार नाहीत कारखान्यांच्या विरोधात आता आरपार ची लढाई करावी लागणार आहे. त्याची दिशा आणि धोरण काय असावे हे एल्गार सभेत शेतकऱ्यांच्या संमतीने ठरवले जाणार आहे.

उसाच्या वजनातील काटामारी रोखण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालकीचा काटा आम्ही घोषणा केल्याप्रमाणे उभा केला आहे. तो या हंगामात शेतकऱ्यांच्या उसाचे वजन करण्यास उपलब्ध होऊन कारखानदारांच्या काटामारीवर शेतकऱ्यांच्या काट्याने त्यांना आम्ही उत्तर दिले असून या भागातील काटामारी चा विषय मुळातून सोडवला आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

1 नोव्हेंबरला मोटर सायकल रॅली
या वर्षीचा हंगाम 1 नोव्हेंबर पासून सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे. आपल्या भागातील कारखाने पण त्याच दरम्यान सुरु होतील. उसाचा दुसरा हप्ता दिल्याशिवाय व पहिली उचल जाहीर केल्याशिवाय कारखान्याच्या तोडी घेऊ नका हे सांगण्यासाठी 1 नोव्हेंबरला आम्ही शिरोळ तालुक्यात मोटर सायकल रॅली काढणार आहे, अशी घोषणा संघटनेने केली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »