अण्णासाहेब पटवर्धन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज रविवार, फेब्रुवारी २, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ १३ , शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:१२ सूर्यास्त : १८:३२
चंद्रोदय : ०९:५३ चंद्रास्त : २२:२५
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : चतुर्थी – ०९:१४ पर्यंत
क्षय तिथि : पञ्चमी – ०६:५२, फेब्रुवारी ०३ पर्यंत
नक्षत्र : उत्तराभाद्रपदा – ००:५२, फेब्रुवारी ०३ पर्यंत
योग : शिव – ०९:१४ पर्यंत
क्षय योग : सिद्ध – ०६:०६, फेब्रुवारी ०३ पर्यंत
करण : विष्टि – ०९:१४ पर्यंत
द्वितीय करण : बव – २०:०२ पर्यंत
क्षय करण : बालव – ०६:५२, फेब्रुवारी ०३ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : मीन
राहुकाल : १७:०७ ते १८:३२
गुलिक काल : १५:४२ ते १७:०७
यमगण्ड : १२:५२ ते १४:१७
अभिजितमुहूर्त : १२:३० ते १३:१५
दुर्मुहूर्त : १७:०२ ते १७:४७
अमृत काल : २०:२४ ते २१:५३
वर्ज्य : ११:२८ ते १२:५८

वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय. वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असे मानले जाते. त्याचे स्वागत करण्याचा हा विशेष दिवस आहे.

भारतात साधारणतः मकर संक्रांतीनंतर (खरेतर २१ डिसेंबरनंतर) सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता – सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे.

वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू झाला असे समजले जाते. तसेच हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे.

सुफी परंपरेतील चिश्ती संप्रदायात हजरत निजामुद्दीन अवलियाचे शागीर्द मोहरीच्या पिवळ्या फुलांच्या रंगात बुडविलेली वस्त्रे नेसून हा सण साजरा करतात. मध्ययुगात या दिवशी ‘सुवसंतक’ नावाचा उत्सव होत असे.

आज वसंत पंचमी आणि देवी सरस्वती जयंती आहे

०२ फेब्रुवारी, १९७१ मध्ये इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला.

आज जागतिक पाणथळ भूमी दिन आहे.

विख्यात वैद्य महर्षी अण्णासाहेब पटवर्धन : ज्या काळात अण्णासाहेबांचे शालेय शिक्षण झाले तो काळ राजकीयदृष्ट्या अत्यंत बिकट होता. १८५७चे स्वातंत्र्यसमर इंग्रजांनी मोडून काढले होते व त्यामुळे इंग्रजांची सत्ता बळकट झाली होती.

या वातावरणात अण्णासाहेब १८६४मध्ये मॅट्रिक झाले. पुढे १८६८मध्ये अण्णासाहेब डेक्कन कॉलेजमधून बीए झाले. नंतर मुंबईत ‘एलएलबी’साठी प्रवेश घेतला. आपले मित्र अण्णा मोरेश्वर कुंटे यांच्या आग्रहाखातर ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये ‘एलएमअँडएस’साठी प्रवेश घेतला आणि एकाच वेळी दोन्ही परीक्षांचा अभ्यास सुरू केला. याबरोबर मुंबईत त्यांच्या सामाजिक कार्यासंबंधी उलाढाली चालूच असत. सुरुवातीचे काही दिवस त्यांनी न्या. रानडे आणि विष्णुशास्त्री पंडित यांच्याबरोबर स्त्री शिक्षण व विधवा पुनर्विवाह याबद्दल खूप काम केले; परंतु थोड्याच दिवसात या सुधारक लोकांचे व त्यांचे मतभेद झाले.

एलएमअँडएस करताना त्यांनी इंग्रजी आणि आयुर्वेद या दोन्ही वैद्यकशास्त्रांचा तुलनात्मक अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी पुण्यातील त्या वेळचे प्रसिद्ध वैद्य लागवणकर यांच्याकडे आयुर्वेदाचा अभ्यास केली; तसेच इंग्रजी पद्धतीचा औषधोपचार व आयुर्वेदिक औषधोपचार याप्रमाणे औषध देणारे दोन स्वतंत्र दवाखाने सुरू केले. त्यांनी वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग आयुष्यभर मोफत वैद्यकीय उपचारांसाठी केला. आयुर्वेदाचा सखोल अभ्यास करून निरनिराळ्या रोगांवर औषधे व काढे तयार केले होते.

देशातील कारखान्यांना उत्तेजन देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यासाठी औद्योगिक प्रदर्शने भरवली होती. कारखान्याबरोबरच त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री मिळवण्यासाठी परदेशावर अवलंबून न राहता ती आपल्या देशातच तयार करावी, असे त्यांचे मत होते. एका स्वीडिश माणसाच्या साह्याने त्यांनी एक काच कारखानाही चालवला होता. मात्र, इंग्रजांनी तो बंद पाडला.

इंग्रजांविरुद्ध टक्कर देण्यासाठी कशाही स्वरूपाची का होईना, पण सत्ता जवळ असली पाहिजे आणि त्यासाठी एखादा स्वतंत्र प्रांतच आपल्या ताब्यात आणण्याची गरज अण्णासाहेबाना वाटू लागली. म्हणूनच त्यांनी हैदराबाद, बडोदा, इंदूर आदी संस्थानांत आपला जम बसवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना बडोद्याची दिवाणगिरी सांगून आली होती. मात्र, त्यांनी ती स्वीकारली नाही. त्यानंतर अण्णासाहेब मद्रासला होते. तेथे त्यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला. नाडी परीक्षा ते याच काळात शिकले.

अध्यात्म हा अण्णासाहेबांचा आवडीचा विषय होता. आळंदीचे श्री नरसिंह सरस्वती हे त्यांचे गुरू होते. अण्णासाहेबांचा अध्यात्म, देशभक्ती व त्यांचे अंगी असलेले कर्तृत्व यांची त्यांच्या गुरूंना जाणीव होती व ते त्यांचे मागे उभे असत. मद्रासला जाण्यापूर्वी अण्णासाहेब ‘किरण’ हे मराठी व ‘डेक्कन स्टार’ हे इंग्रजी अशी दोन वर्तमानपत्रे चालवित होते. मद्रासला जाण्यापूर्वी त्यांनी ती लोकमान्य टिळकांकडे सोपवली.

मद्रासहून परत आल्यावर अण्णासाहेबांनी आपले सर्व व्याप थांबवले व जरूरीपुरती वकिली कामे व वैद्यकीय सल्ला व औषधे देणे, अध्यात्म चिंतन केले. मात्र, राजकारण, सामाजिक कार्य याबाबत त्यांच्या लोकमान्य टिळकांशी गुप्त मसलती करत.

१९१७ मध्ये माघ शु. ११ या तिथीला अण्णासाहेब जग सोडून गेले. पुणे शहरात ओंकारेश्वर जवळ नदीपात्रालगत त्यांचे अंत्यसंस्कार झाले.

त्याजागी लोकमान्यांच्या पुढाकाराने समाधी बांधण्यात आली. दर वर्षी माघ शुद्ध पंचमी ते एकादशी या काळात त्यांचा समाधी उत्सव साजरा होतो.

१९१७: लोकमान्य टिळकांचे स्नेही आणि विख्यात वैद्य महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांनी देहत्याग केला. (जन्म: ४ मे १८४७)

  • घटना :

१८४८: कॅलिफोर्निया गोल्ड रश – सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.
१९३३: अॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
१९४३: दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात झाली.
१९५७: गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.
१९६२: ४०० वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो हे ग्रह एका रेषेत आले.
१९७१: इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला.
१९७१: इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.

मृत्यू :

१९३०: लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे याचं निधन. (जन्म: १२ एप्रिल १८७१)
२००७: हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा याचं निधन. (जन्म: २७ डिसेंबर १९४४)

  • जन्म :

१८५६: स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९२६)
१८८४: ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९३७ – पुणे)
१९०५: जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या अॅन रँड यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९८२)
१९२२: भारतीय फील्ड हॉकीपटू कुंवर दिग्विजय सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९७८)
१९२३: केंद्रीय रेल्वे मंत्री, गृह राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्री, पहिल्या, दुसर्या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार ललित नारायण मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी १९७५ – समस्तीपूर, बिहार)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »