शिल्पकार अप्पासाहेब खेडकर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज मंगळवार, ऑगस्ट १२, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक २१, शके १९४७
सूर्योदय : ०६:१९ सूर्यास्त : १९:०८
चंद्रोदय : २१:१९ चंद्रास्त : ०८:५७
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : श्रावण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : तृतीया – ०८:४० पर्यंत
नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा – ११:५२ पर्यंत
योग : सुकर्मा – १८:५४ पर्यंत
करण : विष्टि – ०८:४० पर्यंत
द्वितीय करण : बव – १९:३९ पर्यंत
सूर्य राशि : कर्क
चंद्र राशि : मीन
राहुकाल : १५:५६ ते १७:३२
गुलिक काल : १२:४३ ते १४:२०
यमगण्ड : ०९:३१ ते ११:०७
अभिजित मुहूर्त : १२:१८ ते १३:०९
दुर्मुहूर्त : ०८:५३ ते ०९:४४
दुर्मुहूर्त : २३:३६ ते ००:२१, ऑगस्ट १३
अमृत काल : ०६:००, ऑगस्ट १३ ते ०७:३१, ऑगस्ट १३
वर्ज्य : २०:५६ ते २२:२६

। अमेयाय च हेरम्ब परशुधारकाय ते ।
मूषक वाहनायैव विश्वेशाय नमो नमः ॥

आज गणेश चतुर्थी आहे

जंगलातील बलाढ्य, म्हटलं तर दिसायला ओबडधोबड, रंगही आकर्षक नाही, भलेमोठे कान, विचित्र आकारातील सोंड, आवाजही कर्कश्श.. कसा दिसतो हा हत्ती.. ! तरीदेखील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना या प्राण्याबद्दल विशेष आत्मीयता वाटते. लहानपणी शिकवल्या जाणाऱ्या चित्रांमध्येसुद्धा पिढ्यान् पिढ्या हत्तीचे कार्टून काढले जाते आहे. आपल्या सणांमध्ये, संस्कृतीमध्ये, आराध्य दैवत असलेल्या गणपतीच्या ख्यायिकेमध्येही हत्तीला विशेष स्थान आहे. पूर्वजांनी तर रानटी हत्तींवर पाळीव प्राण्यांचे संस्कार करून लढाईमध्ये हत्तींना वापरले होते.

भारतीयांच्या मनात हत्तीबद्दल नकळत एक संवेदनशीलता रुजविण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत सर्वांचा लाडका असलेला हा प्राणी अस्तित्त्वाची लढाई लढतो आहे. चोहोबाजूंनी संकटात सापडलेला हा हत्ती सैरभैर झाला आहे. जगात सध्या आफ्रिकन आणि आशियाई हे हत्तींचे दोन प्रमुख प्रकार बघायला मिळतात. सर्वाधिक हत्ती हे आफ्रिकेत असून शंभर वर्षांपूर्वी त्यांची संख्या तीस लाखांहून अधिक असल्याचे संदर्भ सापडतात. पण हस्तीदंतासाठी केलेल्या बेसुमार कत्तलीमुळे हत्तींची संख्या झपाट्याने खाली आली.

अमेरिका आणि चीन या देशात हस्तीदंताची सर्वांत मोठी बाजारपेठ आजही कार्यरत आहेत.

इतर देशांच्या तुलनेत हत्तींची शिकार ही समस्या आपल्याकडे कमी असली, तरी मनुष्य आणि हत्ती हा संघर्ष अधिक गंभीर आहे. त्यामुळे जागतिक हत्ती दिनाच्या निमित्ताने हत्तींबरोबर सहजीवन कसे जगता येईल, याचा विचार होण्याची गरज आहे.

आज जागतिक हत्ती दिन आहे.

विक्रम अंबालाल साराभाई – भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार – हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण पुर्ण करून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोरमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले.

१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
१९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती.

आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.
डॉ. विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली पद्मभूषण आणि १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण हे पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात आले.

१९१९ : पद्म भूषण पुरस्कार सन्मानित भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म ( मृत्यू : ३१ डिसेंबर, १९७१ )

ज्येष्ठ शिल्पकार अप्पासाहेब खेडकर – ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या समर्थ रामदासांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर्णनाला, आपल्या शिल्पकलेतून सार्थ ठरवणारे, शिवाजी महाराजांचे देशभरात ३३ अश्वारूढ पुतळे साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार बी. आर. खेडकर . नऊ फूट उंचीच्या पुतळ्यापासून ते साडेअठरा फूट उंचीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची ३४ शिल्पे खेडकर यांनी घडवली.

सुरुवातीच्या काळात त्यांनी के. आसिफ यांच्या ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटासाठी कलादिग्दर्शनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांना पुणे महापालिका, कुंभार समाज, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, भारती विद्यापीठ केंद्र सरकारच्या दक्षिण सांस्कृतिक विभागाकडून पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले होते. कुंभार समाजाच्या अनेक स्वयंसेवी संस्थांवर त्यांनी काम करून सामाजिक बांधिलकी जपली होती. शिल्पकलेतील अनेक दिग्गज कलाकार घडवण्यामध्ये खेडकर यांचा मोलाचा वाटा आहे.

खेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह बाजीराव पेशवे, राणी चन्नम्मा यांचे अश्वारूढ पुतळे साकारले, संत गगनगिरी महाराज आणि बसवेश्वरांचा पुतळाही त्यांनी त्यांच्या कलेतून साकारला. याशिवाय कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, महात्मा ज्योतिबा फुले आदी महान व्यक्तींची शिल्पे त्यांनी घडवली. सातारा येथील पवई नाक्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हे खेडकर यांचे पहिले काम, त्यानंतर शिवाजी विद्यापीठातील महाराजांचा पुतळा, संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ दिमाखात उभा असलेला महाराजांचा अश्वारूढ पुतळा अशा कलाकृती साकारल्यानंतर खेडकर यांची केंद्रीय स्तरावर दखल घेतली गेली.
कलेचे कोणतेही शिक्षण न घेता उपजत ज्ञानातून ज्येष्ठ शिल्पकार अप्पासाहेब खेडकर यांची कला फुलत गेली. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिल्पकलेसाठी व्यतीत केले. ब्राँझचे पुतळे तयार करणारे ते एकमेव शिल्पकार होते.

१९२६ : निसर्गदत्त मूर्तिकला हि देणगी लाभलेले गणेश मूर्तिकार, शिल्पकार बी. आर. तथा अप्पासाहेब खेडकर यांचा जन्म ( मृत्यू : १३ ऑगस्ट, २०१६ )

  • घटना :
    १८५१ : आयझॅक सिंगर यांना शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.
    १९२० : शिवराम महादेव परांजपे यांनी ‘ स्वराज्य ‘ साप्ताहिक सुरु केले.
    १९२२ : राम गणेश गडकरी यांच्या निधनांनंतर ४ वर्षांनी त्यांनी लिहिलेल्या राजसंन्यास नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
    १९४२ : चाले जावं चळवळ – पुण्यात अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणले गेले तसेच गोळीबारात २ जणांचा मृत्यू झाला तर १६ जण जखमी झाले.
    १९४८ : लंडनमधील ऑलीम्पिक स्पर्धेत भारताने हॉकी मध्ये सुवर्ण पदक मिळवले.
    १९५० : अमेरिकन युद्धकैद्यांना उत्तर कोरिया सैन्याने ठार मारले.
    १९५३ : पहिल्या थर्मोनयुक्लीअर बॉंबची चाचणी झाली.
    १९६० : नासाच्या पहिल्या संचार पुग्रह इको १ ए चे यशस्वी प्रक्षेपण झाले.
    १९६४ : वंश भेदामुळे द. आफ्रिकेची ऑलीम्पिक स्पर्धेतून हाकलपट्टी झाली.
    १९७७ : श्रीलन्केत झालेल्या वांशिक दंगलीत ३०० हुन अधिक जणांचा मृत्यू झाला.

• मृत्यू :
•१९६८ : नामवंत वक्ते व विद्वान साहित्याचार्य बाळशास्त्री व्यंकटेश हरदास यांचे निधन
•१९७३ : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे अध्यक्ष, उद्योगपती, दयानंद बाळकृष्ण उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचे निधन ( जन्म : १२ मार्च, १९११ )
•१९८४ : कवी, समीक्षक, व अनुवादक आनंदीबाई जयवंत यांचे निधन.

  • जन्म :
    १८८० : चरित्रकार, वांड्मय विवेचक बाळकृष्ण गणेश खापर्डे यांचा जन्म
    १८९२ : भारतीय गणित तज्ञ व ग्रंथालय शास्त्रज्ञ एस. आर . रंगनाथन यांचा जन्म ( मृत्यू : २७ सप्टेंबर, १९७२ )
    १९४८ : कवी, लेखक तसेच अनुवादक, समीक्षक फ. मु. शिंदे यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »