बबनराव गायकवाड : वाढदिवस शुभेच्छा
देशातील जुन्या साखर कारखान्यांपैकी एक असलेल्या रावळगाव शुगरला नवजीवन देणारे, साखर उद्योग क्षेत्रातील धडाडीचे व्यक्तिमत्त्व बबनराव गायकवाड यांचा २७ नोव्हेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे मासिकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!
श्री. गायकवाड हे स्पायका ग्रीन एनर्जी अँड ॲग्रो लि. चे चेअरमन आहेत. रावळगाव शुगर कारखाना अनेक वर्षांपासून डबघाईला आला होता. त्यात एनर्जी फुंकण्याचे काम स्पायकाने केले आहे. त्यामुळे रावळगाव परिसरात पुन्हा नवचैतन्य आले आहे. यंदाचा गळीत हंगाम महिलांच्या हस्ते सुरू करण्याचा अभिनव उपक्रम स्पायकाने केला.
अशाच नवनवीन उपक्रमांसाठी आणि नव्या विक्रमासांठी चेअरमन श्री. गायकवाड यांना पुन्हा एकदा शुभेच्छा!