विद्येविना मती गेली

आज गुरुवार, नोव्हेंबर २८, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण ७, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:५४ सूर्यास्त :१७:५९
चंद्रोदय : ०५:०४, नोव्हेंबर २९
चंद्रास्त : १५:५२
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : शरद
चंद्र माह : कार्तिक
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : त्रयोदशी – पूर्ण रात्रि पर्यंत
नक्षत्र : चित्रा – ०७:३६ पर्यंत
योग : सौभाग्य – १६:०२ पर्यंत
करण : गर – १९:३४ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – पूर्ण रात्रि पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक
चंद्र राशि : तूळ
राहुकाल : १३:५० ते १५:१३
गुलिक काल : ०९:४० ते ११:०३
यमगण्ड : ०६:५४ ते ०८:१७
अभिजितमुहूर्त : १२:०४ ते १२:४९
दुर्मुहूर्त : १०:३६ ते ११:२०
दुर्मुहूर्त : १५:०२ ते १५:४६
अमृत काल : ००:३०, नोव्हेंबर २९ ते ०२:१७, नोव्हेंबर २९
वर्ज्य : १३:५० ते १५:३६
।। गेले दिगंबर ईश्वर विभूती। राहिल्या त्या कीर्ति जगामाजी।।१।।
वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी। आता ऐसे कोणी होणे नाही ।।२।।
होय! संत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे ‘आता कोणी ऐसे होणे नाही’ हे ज्ञानदेवाविषयी व्यक्त केलेले कृतज्ञताभाव ज्ञानेश्वरांच्या अलौकिकतेचे प्रतीक आहे.
सर्वसामान्यांना सामावून घेऊन अध्यात्माचे सोपे ज्ञान हे ज्ञानेश्वरांनी भागवत धर्म अर्थात वारकरी संप्रदायाच्या रूपाने दिले.
संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार).
१९३५: भारताचे राष्ट्रपती आणि अर्थतज्ञ, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचा जन्म. ( मृत्यू : ३१ ऑगस्ट, २०२० )
विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत.
जोतीरावांनी पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते.
१८९०: श्रेष्ठ समाजसुधारक जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १८२७)
- गायक व नट रामकृष्णबुवा वझे ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातकीर्त गायक – संगीत शिकणे हे एकच ध्येय घेऊन वयाच्या बाराव्या वर्षी बुवांनी घर सोडले. घर सोडल्यानंतर रामकृष्णबुवा आधी पुण्याला गेले. तेथून संगीत शिक्षणासाठी मुंबई, इंदूर, उज्जैन, वाराणसी असा त्यांचा प्रवास चालू राहिला. ग्वाल्हेर येथे उस्ताद निसार हुसेन खॉं यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर त्यांच्या कारकीर्दीला खरे वळण मिळाले. त्यांनी काही काळ जयपूर येथे मनरंग परंपरेतील मुहम्मद अली खान यांच्याकडूनही शिक्षण घेतले. जयपूर येथे त्यांची गाठ पुन्हा निसार हुसेन खॉं यांच्याशी पडली. ह्या खेपेस खॉंसाहेबांनी वझेबुवांना कसून तालीम दिली. मध्यंतरी वाराणसी येथे त्यांना स्वामी विवेकानंदांच्या सहवासात १५ दिवस राहण्याची संधी मिळाली.
नेपाळमध्ये दरबारगायक म्हणून त्यांनी वर्षभर सेवा केली. त्यानंतर मायदेशी परतण्याच्या ओढीने ते आपल्या मूळ प्रदेशात आले.
गायक नट कै. केशवराव भोसले यांच्या आग्रहावरून बुवांनी ललितकलादर्श या कंपनीच्या नाटकांना चाली दिल्या. स्वातंत्रवीर सावरकरलिखित रणदुंदुभी आणि सन्यस्त खड्ग ह्या संगीत नाटकातली पदे वझेबुवांनी स्वरबद्ध केली होती. वधुपरीक्षा, संन्यासाचा संसार, शहा शिवाजी, श्री, रणदुंदुभी, नेकजात मराठा, सोन्याचा कळस अशा अनेक नाटकांतील त्यांनी संगीत दिलेली पदे लोकांच्या विशेष पसंतीस उतरली. त्यांनी देशभर भ्रमंती करून अनेक मैफली गाजविल्या. त्यांनी तयार केलेल्या गायकीचा ‘वझेबुवांची गायकी’ म्हणून खास गौरव झाला. दुर्मिळ संगीत रागांमधील दुर्मिळ चीजांचे त्यांनी संकलन केले होते, ते ‘संगीत कला प्रकाश’ या शीर्षकाखाली प्रकाशित झाले. गायनावर निस्सीम प्रेम केलेल्या या थोर गायकाने गाणे हे श्रोत्यांसाठी आहे असे सतत मानले. गोव्यात फोंडा तालुक्यात नागेशी येथे त्यांनी १८ वर्षे मुक्काम केला.
बेळगावला काही वर्षे वास्तव्य केल्यानंतर अखेर ते पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात त्यांनी संगीत विद्यालय चालविले.
गोव्यात तसेच महाराष्ट्रात दीनानाथ मंगेशकर, केसरबाई केरकर, व्ही.ए. कागलकरबुवा, तानीबाई, केशवराव भोसले, भास्करराव जोशी, बापूराव पेंढारकर, भार्गवराम आचरेकर, हरिभाऊ घांग्रेकर, भालचंद्र पेंढारकर, गुरुराव देशपांडे, दिनकरपंत फाटक, गजाननबुवा जोशी, शिवरामबुवा वझे, लक्ष्मणराव वझे, मोहनबुवा कर्वे, विनायकराव पटवर्धन अशा पुढे नावारूपाला आलेल्या कलाकारांना रामकृष्णबुवांनी गायनाचे शिक्षण दिले.
१८७२: गायक नट रामकृष्णबुवा वझे यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे, १९४५)
- घटना :
१८२१: पनामाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९३८: प्रभात चा माझा मुलगा हा चित्रपट रिलीज झाला.
१९६०: मॉरिटानियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९६४: नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.
१९६७: जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी पल्सार तार्यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.
१९७५: पूर्व तिमोरला पोर्तुगालपासुन स्वातंत्र्य मिळाले.
२०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.
मृत्यू :
१९६२: गायक, संगीत संयोजक व अभिनेते कृष्ण चंद्र तथा के. सी. डे यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट, १८९३)
१९६३: इतिहासकार व लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचे निधन. (जन्म: २५ मे , १८९५)
१९६७: सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर, १८८०)
१९९९: अकादमी पुरस्कार विजेते बनारस घराण्याचे सारंगीवादक हनुमानप्रसाद मिश्रा यांचे निधन.
२००१: नाटक निर्माते अनंत काणे यांचे निधन.
२००८: अशोकचक्र पुरस्कार सन्मानित (मरणोत्तर) भारतीय हवलदार गजेन्द्र सिंग यांचे निधन.
२००८: अशोकचक्र पुरस्कार सन्मानित (मरणोत्तर) मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९७७)
- जन्म :
१९६४: भारतीय अमेरिकन वकील आणि राजकारणी मायकल बेनेट यांचा जन्म.