शेखर गायकवाड: वाढदिवस शुभेच्छा

very happy birthday to shekhar gaikwad saheb

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुण्यातील “यशदा”चे अतिरिक्त महासंचालक, महाराष्ट्राचे  निवृत्त साखर आयुक्त, प्रशासनावर छाप पाडणारे ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी आणि नेहमी लोकाभिमुख प्रशासन राबवून प्रशासकीय कामकाजाचे आपले वेगळे मॉडेल निर्माण करणारे श्री. शेखर गायकवाड यांचा 13 मे रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.

पुणे पालिका आयुक्त म्हणून त्यांनी ऐन कडक लॉकडाऊनच्या काळात उत्तम काम केले.  FRP साठी त्यांनी खूप चांगले निर्णय घेतले. साखर कारखानदारीला त्यांनी उत्तम शिस्त लावली. कामकाजाचे विकेंद्रीकरण करून साखर उद्योगाला मोठा दिलासा दिला.

प्रशासकीय सेवेत असतानाही त्यांनी लेखनाचा छंद जोपासला. त्यांनी आजवर 35 वर पुस्तके लिहिली आहेत. त्यातील प्रमुख पुस्तके शेतकऱ्यांच्या खूपच उपयोगाची आहेत. 

महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्यांनी सेवा बजावताना आपला खास ठसा उमटवला. सांगलीचे जिल्हाधिकारी असताना नदी पुनरुज्जीवनाचे अशक्य काम त्यांनी करून दाखवले.

श्री. गायकवाड यांनी शेतकरी वर्गाला त्यांच्या हक्काबद्दल जागृत करण्यासाठी विपुल लिखाण केले आहे. त्यांची “जमीन व्यवहार नीती” सारखी अनेक पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत. माहितीपर पुस्तकांखेरीज त्यांनी साहित्यिक लिखाणदेखील केले आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा  रू. एक लाखाचा साहित्य पुरस्कारही  मिळाला आहे. 

अशा या बहुआयामी, अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला शुगरटुडे परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा

त्यांची पुस्तके घेण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

https://sugartoday.in/online-book-store/

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »