आज शनि जयंती

आवडल्यास ही बातमी शेअर करा


आज शनिवार, मे १६, २०२६ युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर वैशाख २६, शके १९४८
सूर्योदय: ०६:०४
सूर्यास्त : १९:०६
चंद्रोदय : चंद्रोदय नहीं
चंद्रास्त : १८:४२
शक : १९४८
संवत्सर : पराभव
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अमावस्या – ०१:३०, मे १७ पर्यंत
नक्षत्र : भरणी – १७:३० पर्यंत
योग : सौभाग्य – १०:२६ पर्यंत
करण : चतुष्पाद – १५:२२ पर्यंत
द्वितीय करण : नाग – ०१:३०, मे १७ पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : मेष – २२:४६ पर्यंत
राहुकाल : ०९:१९ ते १०:५७
गुलिक काल : ०६:०४ ते ०७:४१
यमगण्ड : १४:१३ ते १५:५१
अभिजित मुहूर्त : १२:०९ ते १३:०१
दुर्मुहूर्त : ०६:०४ ते ०६:५६
दुर्मुहूर्त : ०६:५६ ते ०७:४८
अमृत काल : १३:१५ ते १४:४०
वर्ज्य : ०४:०१, मे १७ ते ०५:२५, मे १७

॥ ॐ नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्‌। छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्‌॥

शनिदेव हे कर्माचे आणि न्यायाचे देवता आहेत. ते मनुष्याला त्याच्या कर्माचे फळ देतात असे मानले जाते . शनी जयंतीच्या दिवशी पूजा केल्याने शनिदेवाची साडेसाती, ढैया आणि महादशेचा प्रभाव कमी होतो .

जन्म कथा: पौराणिक मान्यतेनुसार, शनिदेवाचा जन्म वैशाख अमावास्येच्या दिवशी दुपारी १२ वाजता झाला होता. ते सूर्यदेव आणि छायादेवी यांचे पुत्र आहेत.

आज शनी जयंती आहे.

जागतिक कृषी पर्यटन दिन दरवर्षी १६ मे रोजी जगभरात साजरा केला जातो, ज्याचा उद्देश कृषी पर्यटनाला प्रोत्साहन देणे, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे . २००९ पासून, संयुक्त राष्ट्रांच्या (UNWTO) मान्यतेने, हा दिवस शेतकऱ्यांना कृषी-आधारित व्यवसायाच्या संधी शोधण्यास आणि ग्रामीण संस्कृतीचे प्रदर्शन करण्यास प्रोत्साहित करतो.

आज कृषी पर्यटन दिवस आहे.

मुरारबाजी करी कारंजी, पुरंदरावर रुधिराची I
सुकली कुठली दौलत झाली, धर्माच्या ध्वजराजाची II

१६६५ :मुरारबाजी देशपांडे हा शिवरायांच्या मौल्यवान हि-यांपैकी एक हिरा होता. इ.स. १६६५ मध्ये मुघलांनी घातलेल्या पुरंदराच्या वेढ्यात त्यांनी कणखर झुंज दिली. मात्र ३० मार्च १६६५ पासून मुघलांनी केलेल्या सुलतानढव्याचा प्रतिकार करताना, तब्बल १७ दिवस चिकाटीने झुंज देऊन, अखेरीस १६ मे १६६५ रोजी त्यांस वीरमरण प्राप्त झाले.

वीर मुरारबाजींना मानाचा मुजरा !!!

१६ मे – मुरारबाजी देशपांडे ह्यांचा स्मृतिदिन ! (१६६५)

• १८९९: क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांचा आज बलिदान दिन आहे.

रुसी मोदी – यांचा जन्म त्यावेळच्या मुंबई प्रांतात १७ जानेवारी १९१८ रोजी सर होमी मोदी व लेडी जेरबाई या पारशी दाम्पत्याच्या पोटी झाला. मोदी हे त्याकाळात मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रातील जिवंत दंतकथा बनले होते. त्या काळात उद्योग क्षेत्रातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणून रुसी मोदी सर्वाना परिचित होत. ते नेहमी विविध रंगाचे कपडे परिधान करायचे, त्यातून त्यांचा उत्साह प्रतीत होत असे. त्याकाळात पोलाद उद्योग मुक्त झालेला नव्हता त्यामु़ळे स्पर्धा कमी होती.

रुसी मोदी १९७२ मध्ये टिस्कोचे अध्यक्ष असताना बोकारो येथे पहिला पोलाद प्रकल्प पोलाद प्राधिकरणाने सुरू केला. भारतीय पोलाद प्राधिकरणाने १९७३ मध्ये रूरकेला, दुर्गापूर व भिलाई येथे पोलाद प्रकल्प उभे केले.

रुसी मोदी यांचे व्यक्तिमत्त्व चतुरस्त्र होते. टाटा पोलाद समूहाने पोलाद निर्मितीच्या पलीकडेही वळून पहावे असे त्यांना वाटत होते. त्यांच्याच काळात ‘वुई अल्सो मेक स्टील’ हे वाक्य सर्वतोमुखी झाले. त्यांच्या आठवणी अनेक आहेत. एकदा त्यांनी न्याहारीच्यावेळी १६ अंडय़ांचे ऑम्लेट सेवन केले होते. प्रख्यात वैज्ञानिक आइनस्टाइनच्या व्हायोलिन वादनाला त्यांनी पियानोवर साथ केली होती. त्यांचे वडील होमी मोदी हे संयुक्त प्रांताचे पहिले गव्हर्नर होते. त्यांचे शिक्षण हॅरो येथे झाले व नंतरचे शिक्षण ऑक्सफर्डच्या ख्राइस्ट चर्च कॉलेजात झाले. त्यांनी त्यांची पुतणी सिलू हिच्याशी विवाह केला.

रतन टाटा जन्मले, त्यानंतर दोन वर्षांनी १९३९ मध्ये ते टाटा स्टीलमध्ये आले. त्यांनी कंपनीत उत्साही अधिकारी तयार केले. जमशेदपूर येथील कारखान्यात त्यांचे कामगारांशी सौहार्दाचे संबंध होते. त्याकाळात पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट राजवटीत कामगारांचे संप सुरू होते. त्या काळात जमशेदपूर येथे कामगार जोमाने काम करीत होते.

१९७० मध्ये त्यांना सहसंचालक व नंतर सह व्यवस्थापकीय संचालक नेमण्यात आले. टाटा समूहातील कामाने त्यांना नावलौकिक मिळवून दिला. १९९३ मध्ये टाटा समूहातून ते निवृत्त झाले व त्यावेळचे पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांनी त्यांना इंडियन एअरलाइन्स व एअर इंडियाचे सह अध्यक्ष नेमले. नंतर ते राजकारणात आले. त्यांनी झारखंडमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली, त्यात ते पराभूत झाले.

टाटा पोलाद कंपनीचे त्यांनी कठीण काळात नेतृत्व केले होते. ते उद्योग निपुण, समाजनिष्ठ व माणसाचा आदर करणारे होते. त्यांनी टाटा फुटबॉल अकादमी व टाटा स्टील रुरल डेव्हलपमेंट सोसायटी या दोन संस्था स्थापन केल्या.

टाटा कंपनी केवळ पोलाद बनवत नाही तर माणसांचे जीवनमान सर्वागाने सुधारण्यासाठी काम करते हे त्यातून सिद्ध केले. १९३९ मध्ये ते कंपनीत आले तेव्हा ८ लाख टन पोलाद निर्मितीची क्षमता होती, ते निवृत्त झाले त्यावेळी ही क्षमता ३० लाख टनांपर्यंत पोहोचली होती. टाटा समूहाने त्यांना कामाची संधी दिली, त्याचे त्यांनी सोने केले, त्या अर्थाने ते पोलादी पुरुष होते.

• २०१४: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पद्मभूषण रुसी मोदी यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी. १९१८)

  • घटना :
    १८६६: अमेरिकेत पाच सेन्ट किंवा निकेल हे नाणे व्यवहारात आणले.
    १९२९: हॉलिवूडच्या अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ऑस्कर असे नाव पडले.
    १९६९: सोविएत रशियाचे व्हेनेरा-५ हे मानवविरहित अंतराळयान शुक्रावर उतरले.
    १९७५: सिक्कीम भारतात विलीन झाले.
    १९७५: जपानची जुंको तबेई ही माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बनली.
    १९९३: बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम नोंदविला.
    १९९६: भारताचे १० वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली. मात्र आवश्यक पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांचे सरकार केवळ १३ दिवस टिकले.
    २००५: कुवेतमधे स्त्रियांना प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला.

• मृत्यू :

• १९५०: कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १८७८)
१९९४: साहित्य समीक्षक माधव मनोहर यांचे निधन. ( जन्म:२० मार्च, १९११ )
१९९४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक फणी मुजुमदार यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर, १९११ – फरिदपूर, बांगला देश)

  • जन्म :

१८२५: आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च ,१८८४)
१९२६: अमृताहूनी गोड नाम तुझे देवा, क्षणभर उघड नयन देवा , तुझा नि माझा एक पणा , निघाले आज तिकडच्या घरी–झुलवू नको हिंदोळा — अश्या अनेक गोड गीतांना गोड आवाज देणाऱ्या ‘पद्मश्री’ पुरस्कार सन्मानित गायिका माणिक वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर, १९९६)
१९३१: भारतीय राजकारणी व परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंह यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »