गोड साखरेची कडू कहाणी

एलनिनो आला अन पाऊस पडेना
शेतकरी ऊसाची लागवड करीना
सरकार एफ आर पी देता येईना
साखरेचे दर एम एस पी वाढेना||१||
ऊस साखरेचा खेळ मांडला
ऊसाचा धंदा मोडीत काढला
कोजनचा वीजदर कमी झाला
इथेनॉलचा परीस बुळबुळीत झाला||२||
सीबीजी,पोटॅश रिकव्हरी नाही ठोस उपाय
ग्रीन हैड्रोजन,कार्बन क्रेडिट कागदी उपाय
सल्फरलेस साखरेचे हाकारे ऐकू येताय
अशांने आकाशातला चंद्र भेटेल काय||३||
सगळ्या मालाचे भाव तीन पट वाढले
मग साखरेनंच काय सरकारचंघोडं मारले
कार्यक्षमता कमी, त्यानं उत्पादन घटले
खर्च वाढला,बेकारीनं डोकं वर काढले||४||
तांत्रिक निरक्षरता,गजगतीने येणारे तंत्रज्ञान
कारखाने, संशोधन संस्था आहे मूग गिळून
आठवे वेतन आयोग सरकारी कर्मचारी घेतील
साखरकामगार ६व्या आयोग का घेतील||५||
पांढरी साखरेऐवजी कच्ची साखर बनवा
शून्य टक्के मिलबंद तास संकल्पना राबवा
एम साखर ३५ टक्के बनवा डोमेस्टिकला वापरा
एस साखर ६५ टक्के बनवा इंडस्ट्रीला वापरा||६||
करा कच्ची साखर निर्यात,साखरेचा भाववाढवा
बिगर पाणी मिस्रीत इथेनॉलचे भाव वाढवा
ऊस आणि साखरेचा खेळ खंडोबा थांबवा
माणूसकीचा मंत्र ‘जगा आणि जगू द्या’ राबवा||७||
इंजिनिअर कवी
-वाळू रघुनाथ आहेर, नाशिक






