वाढत्या उत्पादन खर्चामुळे साखरेचा दर वाढवणे गरजेचे : प्रा. शिवाजीराव पाटील

आवडल्यास ही बातमी शेअर करा

राशिवडे : वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करता साखरेला प्रतिक्विंटल पाच हजार रुपये दर मिळाला, तरच साखर उद्योग तग धरू शकेल, असे मत भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले. कारखान्याच्या ७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

कारखान्याच्या आर्थिक स्थैर्यासाठी दरवर्षी सहा लाख टन उसाचे गाळप आवश्यक असल्याचे पाटील म्हणाले. अडचणी असूनही मागील हंगामात शेतकऱ्यांना एफआरपीनुसार उसाचा दर दिल्याचे त्यांनी सांगितले. साखरेचा मोठ्या प्रमाणावर औद्योगिक आणि व्यापारी वापर होत असल्याने तिला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्याची मागणीही त्यांनी केली.

सभेत कारखान्यावरील कर्ज, उत्पादन खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि व्याज याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. या प्रश्नांकडे संचालकांनी गांभीर्याने पाहून लवकर निर्णय घ्यावा, अशी सूचना करण्यात आली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »