*ॲग्रिकॉस* दिवाळी अंक प्रकाशित

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे | शुगरटुडे

महाराष्ट्रातील तमाम कृषी पदवीधरांच्या आवडीचा ॲग्रिकॉस हा दिवाळी अंक नुकताच प्रकाशित करण्यात आला. कृषी क्षेत्रातील संधी व आव्हाने ही मुख्य संकल्पना या अंकात मांडण्यात आली आहे.

मुळच्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवलेल्या कृषी पदवीधरांमध्ये हा अंक लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील शेती आधुनिक करण्यासाठी व नवीन करीयरच्या संधी स्पष्ट करणारे अनेक लेख मान्यवरांनी या अंकात लिहिले आहेत. व्यक्ती विशेष सदरामध्ये डॉ. चिमा तसेच कृषीरत्न डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्यावर लेख आहे.

कृषीपदवीधरांनी त्यांचे मंतरलेले कॉलेज जीवन ललित लेखांमध्ये रंजक पद्धतीने मांडले आहे. अतिशय सुंदर व रेखीव चित्रे असलेला हा दिवाळी अंक सर्वांनी संग्रही ठेवावा असा आहे.

महाराष्ट्राचे निवृत्त साखर आयुक्त आणि “यशदा” चे अति. महासंचालक शेखर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षापासून हा विशेष अंक प्रकाशित होत आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »