‘उदगिरी शुगर’च्या गळीत हंगामास प्रारंभ

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सांगली । शुगरटुडे
बामणी (ता. खानापूर) येथील उदगिरी शुगर अँड पॉवर लि. च्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाचा काटा व मोळी पूजन सोहळा कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम आणि अध्यक्ष डॉ. राहुल कदम यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सोनहिरा सहकारी कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार मोहनराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.


कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, कारखान्याने आतापर्यंत शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे एकरकमी ऊस बिल अदा केले आहे. याशिवाय ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखरेचे वाटपही केले जात आहे. आगामी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस उदगिरी कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी कारखान्याचे शेती अधिकारी अमोल नलवडे यांच्याहस्ते सपत्निक श्री सत्यनारायण पूजा करण्यात आली. कारखान्याचे संचालक सूर्यकांत पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
या कार्यक्रमास जे. के. (बापू) जाधव, बामणीचे अभिजित शिंदे, महावीर शिंदे, तानाजी शिंदे, वसंत शिंदे, खंडू शेळके, केशव शिंदे, मंगरूळचे आनंदराव पाटील, पोपटराव शिंदे, सुरेश पाटील, शरद शहा, चंद्रकांत चव्हाण यांच्यासह शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »