जागतिक सरडा दिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शुक्रवार, ऑगस्ट १४, २०२६ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक २३, शके १९४८
सूर्योदय : ०६:१९ सूर्यास्त : १९:०७
चंद्रोदय : ०७:४५ चंद्रास्त : २०:१६
शालिवाहन शक : संवत् : १९४८
संवत्सर : पराभव
दक्षिणायन
ऋतू : वर्षा
चंद्र माह : श्रावण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : द्वितीया – १८:४६ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी – ०३:४२, ऑगस्ट १५ पर्यंत
योग : परिघ – ०९:२८ पर्यंत
करण : बालव – ०७:३९ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – १८:४६ पर्यंत
क्षय करण : तैतिल – ०६:०२, ऑगस्ट १५ पर्यंत
सूर्य राशि : कर्क
चंद्र राशि : सिंह
राहुकाल : ११:०७ ते १२:४३
गुलिक काल : ०७:५५ ते ०९:३१
यमगण्ड : १५:५५ ते १७:३१
अभिजित मुहूर्त : १२:१७ ते १३:०९
दुर्मुहूर्त : ०८:५३ ते ०९:४४
दुर्मुहूर्त : १३:०९ ते १४:००
अमृत काल : २१:३३ ते २३:०५
वर्ज्य : १२:१९ ते १३:५२

हिन्दुराष्ट्र हे अखंड अमुचे अखंड जीवन धार
भिन्न प्रांत आचार भिन्न जरि एकचि परि संस्कार॥
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात,
आसिन्धु सिन्धुपर्यंतः यस्य भारत भूमिका ॥
पितृभू पुण्यभूमिश्च स वै हिन्दु रिति स्मृताः॥

१५ ऑगस्ट, १९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी ते खंडित स्वरूपाचे आहे. १४ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देवतास्वरूप मातृभूमीचे विभाजन झाले.
१९४७ मध्ये झालेली भारत- पाकिस्तान फाळणी ही मागील २५०० वर्षांतील देशाची २४ वीं फाळणी होती. ज्या राजांनी, शक्तींनी मागील २५०० वर्षांत भारतावर आक्रमण केले त्यांनी अफगानिस्तान, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, तिबेत, भूटान, पाकिस्तान, मालद्वीप किंवा बांग्लादेशावर आक्रमण केल्याचा उल्लेख इतिहासातील कुठल्याच ग्रंथात नाही. त्यामुळे हे आताचे छोटे छोटे देश तेव्हा अखंड भारतात होते याला पुष्टी मिळते.


“ गेल्या शे-दोनशे वर्षांपूर्वीपासून ते आत्तापर्यंत अखंड भारताचे तुकडे होऊन (काही मुद्दाम करून) आत्ता आपल्याला / आपल्या मुलांना, नवीन पिढीला खंडित भारताचा नकाशा दाखवला जातो. पण अखंड भारत कसा होता ? हे आजच्या पिढीला (आणि पुढील प्रत्येक पिढीला) समजावून सांगणे गरजेचे आहे.


भारत देश पुनः अखंडित करण्याचा संकल्प प्रत्येकाने सोडणे ही काळाची गरज आहे. परत एकदा आपण अखंड भारताचा संकल्प करूया व तो “ संकल्पच आपल्याला यशाचा मार्ग दाखवेल.”
दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी भारतात (आणि विदेशातही) प्रत्येक शहरात, गावोगावी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे असा संकल्प करण्याचे अनेक कार्यक्रम होत असतात. आपण प्रत्येकाने सहकुटुंब, आपल्या जवळच्या कार्यक्रमात सहभागी होऊन ‘अखंड भारता’चा संकल्प संकल्प करूया..
🚩 तेरावैभवअमररहे माँ हमदिनचाररहेन_रहे 🚩

जागतिक सरडा दिन (World Lizard Day) दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस सरपटणाऱ्या प्राण्यांच्या या खास प्रजातीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, त्यांचे महत्त्व समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पाळला जातो. जगभरात सरड्यांच्या सुमारे ७,००० पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. सरडे शेतातील व घरासमोरील हानिकारक कीटक, माशा आणि गोचीड खाऊन पर्यावरण समतोल राखण्यास मदत करतात.

आज जागतिक सरडा दिन आहे.

रा.स्व. संघाचे – ज्येष्ठय प्रचारक हो. वे. शेषाद्रीजी – बेंगलोरच्या विश्वविद्यालयातून M.Sc.रसायन शास्त्र (सुवर्णपदक) पदवीधर झाल्यांनतर सन १९४६ पासून रा.स्व. संघ कार्याला प्रचारक म्हणून कर्नाटक राज्यातून सुरवात केली. विविध जबाबदाऱ्या घेतल्यानंतर १९८७ पासून संघाचे सरकार्यवाह ही जबाबदारी त्यांचे कडे आली. शेषाद्री जी यांची भाषणशैली अत्यंत अमोघ आणि अद्भुत होती. ते साध्या, सोप्या आणि रंजक उदाहरणांच्या माध्यमातून आपले विचार श्रोत्यांच्या मनावर सहज बिंबवत असत. १९८४ मध्ये न्यूयॉर्क (अमेरिका) येथील ‘विश्व हिंदू संमेलन’ आणि ब्रॅडफर्ड (ब्रिटन) येथील ‘हिंदू संगम’ यामध्ये त्यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

तेथील त्यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांनी परदेशातील नागरिक अत्यंत प्रभावित झाले होते.
संघाचे विचार आणि इतिहास विविध भाषांमध्ये पोहोचवण्यात त्यांचे योगदान मोठे होते. त्यांनी अनेक वैचारिक ग्रंथांची व पुस्तकांची निर्मिती केली. त्यांची ‘कृतिरुप संघदर्शन’ ही पुस्तक रचना संघ वर्तुळात अत्यंत मार्गदर्शक मानली जाते.

अनेक विषयांवर त्यांनी पुस्तक लेखन केले.त्यात फाळणीची शोकांतिका, काश्मीर समस्यांबद्दल काश्मीर एक धुमसते बर्फ, चिन्तन गंगा, युगावतार (छत्रपती शिवाजी महाराजांवर), अम्म बगिलू तेगे (निबन्ध), भुगीलू (आपातकाल पर). ही विशेष पुस्तके आहेत. तसेच ‘विक्रम’, ‘उत्थान’, ‘आर्गनाइजर’ व पाञ्चजन्य ह्यामधून सुद्धा विपुल लेखन केलेले आहे. १९८२ मध्ये त्यांना “तारबेरालू ” ह्या ग्रंथ लेखनाबद्दल कर्नाटक साहित्य अकादमीने सन्मानित केले.


२००५ : रा.स्व. संघाचे ज्येष्ठय प्रचारक सरकार्यवाह, होन्गासान्द्रा वेण्कटरमइया शेषाद्री (हो. वे. शेषाद्री) यांचे निधन. (जन्म २६ मे १९२६)

पहिल्या स्त्री वकील गोदावरी परुळेकर-

ह्या भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, व मराठी लेखिका होत्या. गोदावरी परुळेकर ह्यांचे वडील ख्यातनाम वकील होते. त्यांच्या घरात आधुनिक वातावरण होते. बी.ए. एल्.एल.बी. झालेल्या गोदावरीबाईं कामगार चळवळीत सामील झाल्या. याच काळात साम्यवादी कार्यकर्ते शामराव परुळेकर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या.


१९४५च्या सुमारास महाराष्ट्र प्रांतिक सभेच्या कामानिमित्त परुळेकर दांपत्य ठाणे जिल्ह्यातील आदिवासी वस्तीच्या डहाणू, तलासरी गावात फिरत असताना तेथील आदिवासींचे गुलामगिरीचे भीषण जीवन पाहून तेथेच काम करायचे त्यांनी ठरवले. त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या शोषणाविरुद्ध सावकार, जमीनदारांविरुद्ध संघर्ष उभारताना आलेले अनुभव या लढ्याची कहाणी, `जेव्हा माणूस जागा होतो’ या पुस्तकात गोदावरीबाईंनी चित्रबद्ध केली.

‘जेव्हा माणूस जागा होतो’ या समाजशास्त्रीय ग्रंथातून त्यांनी जमीनदारांकडे पिढयानपिढया वेठबिगारीने काम करणाऱ्या आदिवासी स्त्री पुरुषांचे केलेले भयानक चित्रण अंगावर शहारे आणणारे आहे. आदिवासी समाजाला आपल्या हक्काची जाणीव करून दिल्यावर हा माणूस कसा जागा झाला यावर हा ग्रंथ बेतलेला आहे.

यातील ‘वेठबिगारी गाडून टाकली’ या प्रकरणातून आदिवासींच्या कोंडलेल्या भावना जागृत होऊन त्यांच्यात नवचैतन्य कसे निर्माण झाले याचे वर्णन केले आहे. याखेरीज त्यांनी आर्थर रोड, ठाणे, दिल्ली येथील तुरुंगात भेटलेल्या गुन्हेगारावर ‘बंदिवासाची आठ वर्ष’ हे पुस्तक लिहिलेले आहे.


१९०७: महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील गोदावरी परुळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९९६)

घटना :
१६६०: मुघल फौजांनी चाकणचा किल्ला ताब्यात घेतला.
१८६२: मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना.
१८९३: मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश.
१९४५: दोन अणुबाँबच्या भयावर संहारामुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला.
१९४३: नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवी दिली.
१९४७: पाकिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९४७: लॉर्ड माउंट बॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक.
१९५८: एअर इंडियाची दिल्ली – मॉस्को विमानसेवा सुरू झाली.
१९७१: बहारीनला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
२००६: श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात चेन्चोलाई येथे ६१ तामिळ मुली ठार झाल्या.
२०१०: पहिल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धा सिंगापूरमधे घेण्यात आल्या.

मृत्यू :
१९८४ : भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळात ऑलिंपिकमध्ये फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक – पहिले वैयक्तिक पदक मिळवणारे कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचे निधन (जन्म : १५ जानेवारी, १९२६)
२०११ : हिन्दी चित्रपट अभिनेते व निर्माते शम्मी कपूर यांचे निधन (जन्म : २१ ऑक्टोबर, १९३१)
२०१२: महाराष्ट्राचे १४वे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन. (जन्म: २६ मे,१९४५)
२०२२ : महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी एक,भारतीय राजकारणी आणि शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख, विनायक तुकाराम मेटे यांचे अपघाती निधन (जन्म : ३० जून १९६३)

जन्म :
१९११: भारतीय तत्त्वज्ञानी वेदतिरी महाऋषी यांचा जन्म.
१९२५: साहित्यिक, नाटककार पत्रकार जयवंत दळवी यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर, १९९४)
१९५७: विनोदी अभिनेतते जॉन प्रकाश राव जनुमला ऊर्फ जॉनी लिव्हर यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »