सिद्धी शुगरचे चेअरमन बाबासाहेब पाटील नवे सहकारमंत्री

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मुंबई : साखर उद्योगाचे नियंत्रण असणाऱ्या सहकार खात्याचे नवे मंत्री म्हणून आमदार बाबासाहेब पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) अहमदपूरचे (जि. लातूर) आमदार असून, ६६ वर्षांचे आहेत. त्यांचा नुकताच म्हणजे ५ डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा झाला.

SIDDHI SUGAR AHMEDPUR
SIDDHI SUGAR, UJANA AHMEDPUR

उजना (ता. अहमदपूर) येथे असलेल्या सिद्धी शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. लि.चे ते चेअरमन आहेत. तर अविशना जाधव हे कारखान्याचे एमडी आहेत. चार हजार मे. टन क्षमतेचा हा कारखाना असून, गेल्या हंगामात पाच लाख टन ऊस गाळप केले होते. कारखान्याची डिस्टिलरी ६० केएलपीडी क्षमतेची आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप शनिवारी रात्री जाहीर करण्यात आले. नागपूरमधील अधिवेशनच संपताच खातेवाटप जाहीर झाले. शनिवारी रात्री खातेवाटप जाहीर होणार, असे भाकीत ‘शुगरटुडे’ने आधीच वर्तवले होते.

राज्यातील सहकार चळवळ खूप व्यापक आणि ग्रामीण महाराष्ट्राचा आर्थिक कणा असल्याने सहकार खाते अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. गृह, अर्थ, नगरविकास, महसूल यांच्यानंतर सहकार खात्याचाच क्रमांक लागतो. मागच्या महायुती सरकारच्या काळात सहकार खात्याची जबाबदारी काही काळ अतुल सावे यांच्याकडे, तर नंतर दिलीप वळसे पाटील या ज्येष्ठ नेत्याकडे होती.

निवडणुकीनंतर महायुती सरकार सत्तारूढ झाल्यापासून सहकार खात्याची जबाबदारी नेमकी कोणाकडे राहणार, याबाबत सहकार आणि साखर उद्योग क्षेत्रांमध्ये कमालीची उत्सुकता लागून राहिली होती. हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार हे निश्चित होते. शिवाय ते पश्चिम महाराष्ट्रातील नेत्याकडे राहील, असा अंदाजही वर्तवला जात होता. मात्र उपमुख्यमंत्री अजितदादांनी सर्वांना धक्का देत आपले खंदे समर्थक, बाबासाहेब पाटील यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे.

सहकार खाते शोभेचे खाते नसून, त्याची नाळ आर्थिक विकासाशी जोडली असल्याने, या खात्याची जबाबदारी जाणकार नेत्याकडे राहिल्यास महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळते, असा आजवरचा अनुभव आहे. बाबासाहेब पाटील या कसोटीवर उतरतील, अशी आशा आहे. कारण त्यांना सहकार आणि राजकारणाचा मोठा अनुभव आहे.
श्री. पाटील हे २००९ साली पहिल्यांदा अहमदपूर मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी विनायकराव जाधव यांचा पराभव केला होता. २०१९ मध्ये ते पुन्हा विधानसभेवर निवडून गेले आणि २०२४ साली तिसऱ्यांदा ते मोठ्या मतांनी विजयी होत आमदार झाले.
श्री. पाटील यांनी शिरूर ता. (जि. लातूर) येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे. विद्यार्थी दशेपासून ते राजकीय चळवळीमध्ये आहेत.

खातेवाटप असे
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांकडील खाती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खात्यासह ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते स्वत:कडे ठेवली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा नगरविकास खात्याची जबाबदारी मिळाली आहे. याशिवाय शिंदेकडे ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग या खात्यांची जबाबदारी देखील असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र पुन्हा एकदा अर्थमंत्रालय आपल्याकडे ठेवण्यात बाजी मारली आहे. याशिवाय अजित पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क खात्याची देखील जबाबदारी असणार आहे.

कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister)
1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण

4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

5.गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा

7.गणेश नाईक – वन

8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण

9.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण

10.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा

13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल

14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर

16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय

17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान

19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

20.अदिती तटकरे – महिला व बालविकास

21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम

22.माणिकराव कोकाटे – कृषी

23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज

24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन

25.संजय सावकारे – कापड

26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय

27.प्रताप सरनाईक – वाहतूक

28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन

29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे

31.आकाश फुंडकर – कामगार

32.बाबासाहेब पाटील – सहकार

33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात उद्या पैसे जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर
राज्यमंत्री (State Ministers )

  1. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
  2. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
  3. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
  4. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
  5. योगेश कदम – ग्रामविकास, पंचायत राज
  6. पंकज भोयर – गृहनिर्माण
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »