सह्याद्री साखर कारखान्यावर पुन्हा बाळासाहेब पाटलांचीच सत्ता!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कराड : तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखावर पुन्हा माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचीच सत्ता कायम राहिली आहे. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पी. डी. पाटील पॅनलने सुमारे ८ हजार मताधिक्याने विजय मिळविल्याने समर्थकांनी गुलालाची उधळण करत मोठा आनंदोत्सव साजरा केला.

 या निवडणुकीसाठी शनिवारी चुरशीने मतदान झाले होते. रविवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती. ती रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यादरम्यान सत्ताधारी पॅनलची विजयी आघाडी पाहता विरोधातील भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांच्या तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व सहकाऱ्यांच्या पॅनलचा धुव्वा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पहिल्यांदा १ ते ५० मतदान केंद्रांवरील मतमोजणी झाली. त्याचा निकाल दुपारी २ वाजता जाहीर झाला. त्यात सुमारे ४ मतांची आघाडी सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने घेतल्याचे समोर आले होते. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास उरलेल्या ५१ ते ९९ या मतदान केंद्रांवरील मतमोजणीला सुरुवात झाली. त्यातही तोच कल कायम दिसताच मात्र कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली. रात्री दहाच्या सुमारास उत्पादक गटातील मतमोजणी संपली. त्यात ८ हजारांवर मतांची आघाडी घेत सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने विजय मिळविला. इतर गटांतील मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

सत्ताधारी पी. डी. पाटील पॅनलचा ८ हजार मताधिक्याने विजय !

माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील पॅनलने सुमारे ८ हजारांहून अधिक मताधिक्याने निवडणूक जिंकल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला सरासरी ७,५०० मते, तर बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला सरासरी १५ हजार ५०० मते मिळाली आहेत. काँग्रेसचे निवास थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजप युवा मोर्चाचे रामकृष्ण वेताळ यांच्या पॅनलला सरासरी २,२०० मते मिळाली आहेत.

य  निवडणुकीमुळे कार्यक्षेत्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. मतदारांच्या गाठीभेटी, जाहीर प्रचार सभा, त्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या.  त्यामुळे याचा निकाल नेमका काय लागणार? याची मोठी उत्सुकता होती.

पी. डी. पाटील पॅनलचे विजयी उमेदवार

कऱ्हाड गट १

शामराव पांडुरंग पाटील  – १५०२७

अण्णासो रामराव पाटील – १५५०१

तळबीड गट क्रमांक २

संभाजी शंकर साळवे – १४४९३

सुरेश नानासो माने – १५१९१

उंब्रज गट क्रमांक ३

विजय दादासो निकम – १४७७०

संजय बापूसो गोरे – १५२६६

जयंत धनाजी जाधव – १४७८८

कोपर्डे हवेली गट क्रमांक ४

सुनील जानदेव जगदाळे – १४८६७

नेताजी रामचंद्र चव्हाण – १५५३७

राजेंद्र भगवान पाटील – १४८२८

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »