संजीवनी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी फेरनिविदा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पणजी : सध्या संजीवनी साखर कारखाना बंदच आहे. याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्याचे आधुनिकीकरण करणे, इथेनॉलमध्ये उत्पादन प्रणाली बदलणे आणि गूळ बनवण्याच्या युनिट्सना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. यापार्श्वभुमीवर संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी पुन्हा निविदा काढल्या जाणार असल्याची माहिती राज्य सरकारने  दिल्याचे समजते.

या साखर कारखान्याचा पुनर्विकास करून सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारे इथेनॉल उत्पादन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर गोवा राज्य सरकारने ऑक्टोबर २०२२ आणि जानेवारी २०२४ अशा दोन वेळा निविदा मागवल्या होत्या. पहिल्यांदाच दोन कंपन्यांनी रस दाखवला; परंतु तांत्रिक पात्रता निकष पूर्ण न केल्यामुळे दोन्ही निविदा नाकारण्यात आल्या आहेत. दुसऱ्यावेळी एकही पुन्हा-बोली मिळाली नाही. डिझाइन-बिल्ड-फायनान्स-ऑपरेट ट्रान्सफर या तत्त्वावर कारखान्याचा पुनर्विकास केला जाईल.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »