जागतिक दृष्टिदान दिन

आज बुधवार, जून १०, २०२६ युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर ज्येष्ठ २०, शके १९४८
सूर्योदय : ०६:०० सूर्यास्त : १९:१६
चंद्रोदय : ०२:२१, जून ११ चंद्रास्त : १४:१७
शक : १९४८
संवत्सर : पराभव
उत्तरायण
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ (अधिक)
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : दशमी – ००:५७, जून ११ पर्यंत
नक्षत्र : उत्तराभाद्रपदा – ०९:२१ पर्यंत
योग : आयुष्मान् – ०६:३० पर्यंत
क्षय योग : सौभाग्य – ०४:०३, जून ११ पर्यंत
करण : वणिज – १३:५२ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – ००:५७, जून ११ पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : मीन
राहुकाल : १२:३८ ते १४:१७
गुलिक काल : १०:५९ ते १२:३८
यमगण्ड : ०७:४० ते ०९:१९
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त१२:११ ते १३:०५
अमृत काल : ०५:५९, जून ११ ते ०७:३०, जून ११
वर्ज्य : २०:४९ ते २२:२०
” लहानपणी डोळ्याला रुमाल बांधून खेळलेला आंधळी कोशिंबीर हा खेळ आठवा तसेच रात्रीचे वेळी वीज गेल्यानंतर आपली होणारी अस्वस्थता जाणा ह्यातून दृष्टिहिनांच्या आजन्म असणाऱ्या वेदना समजावून घ्या “
‘असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’ या घोषवाक्याचा आधार घेत डोळ्यांविषयी काळजी घेत अंध व्यक्तींना नेत्रदान करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जगभर प्रयत्न सुरू आहेत.
भारतामध्ये जगाच्या एक चतुर्थांश व्यक्ती दृष्टीहीन आहेत. साधारण दृष्टीदोषाने 27 दशलक्ष व्यक्ती ग्रासित आहे. दोन्ही डोळ्यांच्या अंधत्व 9 दशलक्ष लोकांना असून 3 दशलक्ष अंध बालके आहेत. बाहुलीचा पडदा खराब असणार्या अंध व्यक्तीची संख्या 4.60 दशलक्ष असून बाहुलीच्या पडदा रोपणामुळे जवळपास 3 दशलक्ष लोकांना लाभ झाला आहे.
निसर्गाची अद्भूत किमया अंधानाही पाहता यावी यासाठी मानवतेच्या दृष्टीकोणातून आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान करण्यासाठी आजच कायदेशीर कार्यवाही करु या.
डोळ्यात दाटलेल्या काळ्याकुट्ट अंधारातून उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तींना नेत्रदानाच्या माध्यमातून हे जग सुंदर आहे़ याची प्रचिती देण्याची प्रेरणा देणारा हा दिवस आहे. नेत्रदानाबाबत जनसामान्यांमध्ये जागृती व्हावी, अशी अपेक्षा या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून व्यक्त होत आहे.
शासकीय सेवेत नेत्रचिकिस्तक म्हणून अहोरात्र झटणाऱ्या डॉ. रामचंद्र यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर आहे. त्यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यात दहा जून १९२४ रोजी झाला.कौटुंबिक परिस्थिती खडतर असतानाही जिद्द व चिकाटीच्या बळावर त्यांनी ऐंशी हजारांहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया केल्या. अंधाचे आयुष्य प्रकाशमय करणाऱ्या या दीपस्तंभाची (जन्मदिन १० जून १९२४ ) ज्योत दहा जूनलाच (१९७९) मावळली. म्हणूनच या दिवसाचे औचित्य साधत हा दिवस नेत्रदान दिवस म्हणून साजरा होतो.
आज जागतिक दृष्टिदान दिन आहे .
महायोगी गगनगिरी महाराजांची इतर वैशिष्ट्ये सध्याच्या कलीयुगामध्येही योगशास्त्रातील अनेकविध अवघड सिद्धी व चमत्कार प्रत्यक्ष आत्मसात केलेले असे ते महायोगी होते. योगशास्त्रातील विमलज्ञान, शिवयोग, उन्मनी विद्या, गोरक्षनाथी विद्या अशा अनेक विद्या त्यांना आत्मसात होत्या.
निसर्गाच्या सान्निध्यात अनेक प्रकारची खडतर तपे करून त्यांनी हे अत्यंत अवघड व वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान आत्मसात केले होते. प.पू. महाराजांनी योगसामर्थ्यांचा संदेश सर्वत्र पोहोचवला. प.पू. महाराजांनी हिमालय व गंगेचे खोरे येथेही तपश्चर्या केली. १९३२ ते १९४० सालापर्यंत महाराजांनी दाजीपूर येथील पाटाचा डंक या भागात राहून अरण्यनिवासी तप केले. १९६५ पासून त्यांची कीर्ती जगभर पसरली. निर्मनुष्य व अनेक हिंस्त्र श्वापदे असणाऱ्या गगनगडावरील ५२ तळी व सांगलीतील वाटार येथील ५ ते ६ डोहांत त्यांनी दीर्घकाळ जलतपश्चर्या केली. त्यासाठी ते पाण्याच्या तळाशी जाऊन योगिक क्रियांच्या साहाय्याने तेथे ध्यान लावून कित्येक तास बसत असत.
१९१८ : आज गगनगिरी महाराज जन्मदिन आहे (श्रीपाद बाळासाहेब पाटणकर (साळुंखे) हे त्यांचे मूळ नाव.) समाधी: ४-२-२००८
द्रष्टा आणि समाजाभिमुख उद्योगपतीराहुल बजाज – रोजगारांची निर्मिती आणि राष्ट्रीय उत्पन्नात देशातील वाहन उद्योगाचे मोठे योगदान असून, त्याच्या पायाभरणीच्या काळात बजाज यांनी या क्षेत्राचे नेतृत्व केले. माहिती तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्राची भरभराट होण्यापूर्वी वाहन उद्योग हा देशातील अर्थव्यवस्थेचा एक कणा होता. मात्र, अनेक बंधनांच्या काळात बजाज यांनी कणखरपणे वाटचाल करून देशाच्या संपत्तीनिर्माणामध्ये मोठा वाटा उचलला आहे. नियंत्रित अर्थव्यवस्थेतील परवाना राज, खुल्या अर्थव्यवस्थेत भारतीय उद्योगांचे हितरक्षण आणि जागतिक स्पर्धेचा मुकाबला अशा बदलत्या काळातील आव्हानांना राहुल बजाज यांनी यशस्वी सामना केला आणि बजाज समूहाला जगातील यशस्वी उद्योगांमध्ये स्थान मिळवून दिले.
आजोबा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जमनलाल बजाज आणि वडील कमलनयन बजाज यांच्याकडून त्यांच्यावर गांधी-नेहरूंच्या विचारांचे संस्कार झाले. अर्थशास्त्र, कायदा आणि व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर राहुल हे ‘बजाज ऑटो’मध्ये अधिकारी म्हणून रुजू झाले. नवलमल फिरोदिया यांच्याकडून त्यांनी व्यवसायातील बारकावे शिकून घेतले. उद्योगांचे अर्थकारण आणि विपणन यांवर त्यांचे प्रभुत्व होते.
‘पिॲजिओ’ या इटालियन कंपनीने कराराला मुदतवाढ देण्यास नकार दिल्याने बजाज यांनी ‘चेतक’ ही भारतीय बनावटीची स्कूटर बाजारात आणली आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली कंपनीने भरारी घेऊन अब्ज डॉलरची उलाढाल गाठली. तोवर तीनचाकी वाहनांच्या क्षेत्रातील आघाडीच्या बजाज समूहाने दुचाकींची नवनवी मॉडेल बाजारात आणून या क्षेत्रावरही ठसा उमटविला.
‘बजाज’च्या स्कूटर्स बदलत्या काळात उत्पन्न वाढू लागलेल्या मध्यमवर्गीयांच्या आकांक्षांचे प्रतीक बनल्या. त्यांच्या वाहनांसाठी काही वर्षे वाट पाहावी लागत असे. विपणनाचा मोठा अभ्यास असलेल्या बजाज यांनी हाती घेतलेली ‘हमारा बजाज’ ही जाहिरात मोहीम भारतीयत्वाला साद घालणारी सर्वांत मोठी मोहीम ठरली. पुण्याशेजारील पिंपरी आणि औरंगाबादेतील वाळुज औद्योगिक क्षेत्रात ‘बजाज ऑटो’च्या आधाराने अनेक लघुउद्योग बहरले आणि हजारो कामगारांना त्यामध्ये रोजगार मिळाला.
अनेक शहरांमध्ये बजाज यांच्या रिक्षाने हजारो कुटुंबांना रोजगाराचे साधन मिळवून दिले. या परिसराच्या आर्थिक-औद्योगिक विकासामध्ये मोठा वाटा उचलणाऱ्या बजाज यांच्याशी या शहरांचे मोठे ऋणानुबंध आहेत. कंपनीच्या आवारातच निवास करणारे, कामगारांशी आपुलकीने संवाद साधणारे राहुल बजाज हे उद्योगाच्या विकासाचा ध्यास घेणारे आगळे उद्योगपती ठरतात. बदलत्या काळाशी त्यांनी केवळ जुळवूनच घेतले नाही; तर काळाच्या वेगावर ते स्वार होणारे ते दूरदर्शी उद्योजक होते.
खुल्या अर्थव्यवस्थेची पावले ओळखून वाहनांच्या पलीकडे जाऊन विमा, वित्तपुरवठा, घरगुती उपकरणे, इलेक्ट्रिक आणि पवनऊर्जा अशा क्षेत्रांमध्ये त्यांनी उद्योगाचा पाया विस्तारला. जपानी कंपन्यांच्या दुचाकींनी भारतीय उद्योगांपुढे मोठे आव्हान निर्माण केले होते. मात्र, या काळात नव्या पिढीच्या आवडीनिवडी ओळखून, नवी उत्पादने सादर करून त्यांनी कंपनीला पुन्हा आघाडीचे स्थान मिळवून दिले. भारतीय उद्योगाने जागतिक स्पर्धेत मिळविलेले यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
१९३८: पद्म भूषण पुरस्कार सन्मानित भारतीय उद्योगपती राहुल बजाज यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी २०२२ )
- घटना :
१७६८: माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामधे धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादा पराभूत झाला.
१८९० : नारायण मेघाजी लोखंडे यांचे प्रयत्नांमुळे , लढ्यामुळे सप्ताहातील सातही दिवस राबणाऱ्या कामगारांना १० जून , १८९० पासून साप्ताहिक सुट्टी सुरु झाली.
१९२४: इटलीच्या समाजवादी नेता ज्याकोमो मॅट्टेओटी यांची हत्या.
१९३५: ॲक्रन अॅक्रन, ओहायो येथे बॉब स्मिथ बिल विल्सन यांनी अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस या संस्थेची स्थापना केली.
१९४०: दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९४०: दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स व इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारले.
१९४४: ओरादू-सुर-ग्लेनची कत्तल, स्त्री बालकांसह ६४२ व्यक्तींची हत्या.
१९७७: ॲपल कॉम्प्युटर्सचा ॲपल-II हा संगणक बाजारात आला.
१९९९: उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती साठी निवड झाली.
२००३: स्पिरिटरोव्हर मंगळाकडे रवाना.
• मृत्यू :
• १९०६: गुजराती लेखक समीक्षक गुलाब दासब्रोकर यांचे निधन.
• १९५५: भारतीय-अमेरिकन गोल्फर मार्गारेट अॅबॉट यांचे निधन. (जन्म: १५ जून१८७८)
• २००१: सामाजिक कार्यकर्त्या फुलवंतीबाई झोडगे यांचे निधन.
२०१९ : पद्मभूषण , ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार सन्मानित आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचे निधन (जन्म : १९ मे १९३८)
- जन्म:
१९०८: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, जनरल जयंतीनाथ चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल, १९८३)
१९३८: भारतीय गणितज्ञ आणि शैक्षणिक वासंती एन. भाट नायक यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी, २००९)
१९५५: भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचा जन्म.






