कर्नाटकात इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन :  मंत्री शिवानंद पाटील

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बेळगाव : इथेनॉल हे पर्यावरणपूरक इंधन असून कार्बन डायऑक्साइडचे उत्पादन कमी करते. अशा हरित इंधनाला प्रोत्साहन देण्याची योजना राज्य सरकार योजना आखत असल्याची माहिती साखर व वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील यांनी दिली. तसेच केंद्र सरकारचे हरित ऊर्जेचा वापर अनिवार्य करण्याचे उद्दिष्ट असून राज्यात टप्प्याटप्याने उत्पादन सुरू झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

येथील गणेशपूर रोडवरील निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट सभागृहात शनिवारी (दि. ५) दक्षिण भारतीय ऊस आणि
साखर तंत्रज्ञ संघटना आणि एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे परिसंवाद झाला. त्यावेळी ते उद्घाटक
म्हणून बोलत होते. 

मंत्री पाटील म्हणाले की, ऊस हे साखर आणि इथेनॉलचे उत्पादन करणारे देशाला नवीन तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे एक नवीन वैज्ञानिक प्रणाली स्वीकारण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि ग्रामीण समृद्धीसाठी साखर उद्योग आणि सहकारी संस्थांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने साखर उद्योगात पर्यावरण संवर्धन शक्य होऊन उत्पन्न वाढेल.

या परिसंवादात ऊस विकास आयुक्त आणि साखर संस्थेचे संचालक आर. रविकुमार, दृअल्ट बायोएनर्जी आणि एमआरएन ग्रुप डायरेक्टर वाय. बी. रामकृष्ण, दक्षिण भारतीय ऊस आणि साखर तंत्रज्ञ संघटनेचे अध्यक्ष चिन्नप्पन, बिळगी साखर कारखान्याचे अध्यक्ष एस. आर. पाटील, राष्ट्रीय साखर संस्थेच्या संचालिका सीमा पारोहा, विक्रमसिंह शिंदे, दक्षिण भारतीय ऊस आणि साखर तंत्रज्ञ संघटनेचे उपाध्यक्ष आणि संयोजक जे. डी. आनंद मुरुगन, टूअल्ट बायोएनर्जी आणि एमआरएन ग्रुप संचालक आणि विविध संस्थांचे संचालक आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »