बंकिमचंद्र चटर्जी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज मंगळवार, एप्रिल ८, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १८, शके १९४७
सूर्योदय : ०६:२७ सूर्यास्त : १८:५४
चंद्रोदय : १५:१५ चंद्रास्त : ०४:१४, एप्रिल ०९
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : चैत्र
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : कामदा एकादशी – २१:१२ पर्यंत
नक्षत्र : आश्लेषा – ०७:५५ पर्यंत
योग : शूल – १८:११ पर्यंत
करण : वणिज – ०८:३२ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – २१:१२ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : कर्क – ०७:५५ पर्यंत
राहुकाल : १५:४७ ते १७:२१
गुलिक काल : १२:४० ते १४:१४
यमगण्ड : ०९:३४ ते ११:०७
अभिजित मुहूर्त : १२:१५ ते १३:०५
दुर्मुहूर्त : ०८:५६ ते ०९:४६
दुर्मुहूर्त : २३:३१ ते ००:१७, एप्रिल ०९
वर्ज्य : २०:५६ ते २२:४०

भारताचे ‘अलेक्झांडर ड्यूमा’ म्हणून ओळखले जाणारे बंकिमचंद्र चटर्जी सुरवातीपासूनच एक हुशार विध्यार्थी होते. लहान पणापासूनच त्यांचे मन लिहण्या वाचण्यात रमत असे. अशी महान बुद्धि असणारे बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपल्या शालेय जीवनातच एक कविता लिहून आपल्या लिखाणातून सर्वाना अचंबित करून टाकल होतं.
तसेच, त्यांना संस्कृत भाषे प्रती खूपच आकर्षण होत. शिक्षणा बरोबरच खेळामध्येही त्यांची खूप आवड होती. शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात ते मोठ्या उत्साहाने सहभाग घेत असतं. आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्या नंतर बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपले पुढील शिक्षण “मोहसीन” महाविद्यालयात पूर्ण केले.
सन १८५८ साली बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपल्या वयाच्या विसाव्या वर्षी “प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून” आपली आर्ट्स (कला) विषयाची पदवी पूर्ण केली. याचबरोबर सन १८५७ च्या पूर्वी स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळेला “कलकत्ता विद्यापीठातून” पदवी ग्रहण करणारे ते पहिले भारतीय नागरिक आहेत. यानंतर त्यांनी आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केलं.

बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर ब्रिटीश शासनाच्या राजवटीत सरकारी सेवेत दंडाधिकारी(मजिस्ट्रेट) म्हणून रुजू झाले. दंडाधिकारी म्हणून बंकिमचंद्र चटर्जी यांनी ब्रिटीश शासनाच्या राजवटीतील सरकारमध्ये जवळपास ३० वर्ष सेवा दिली. यानंतर, सन १८९१ साली त्यांनी आपली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
एकोणिसाव्या शतकात बंकिमचंद्र चटर्जी यांनी बंगाली साहित्याला एक नवीन दिशा दिली होती. त्यांच्या मुळेच बंगाली साहित्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. असे महान साहित्यिक असणारे बंकिम चंद्र चटर्जी स्वत:ला ईश्वरचंद्र गुप्ता यांना आपले आदर्श मानत असतं. त्यांच्याच आदर्शांवर चालून बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपल्या साहित्यिक क्षेत्राची सुरवात केली.

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी इंग्रजीत लिहिलेली प्रथम प्रकाशित कादंबरी ‘रायमोहन्स वाईफ” ही होय. त्यांची ही कादंबरी इंग्रजी भाषेत असल्याने त्या कादंबरीला जास्त प्रसिद्धी मिळू शकली नाही. कारण, त्यावेळेस इंग्रजी भाषेचं ज्ञान भारतातील कमीत कमी लोकांना अवगत होतं.

यानंतर त्यांनी आपल्या क्षेत्रातील बंगाली भाषेत साहित्य लिहायला सुरवातच नाही केली तर, त्या साहित्याला नव्या पातळीवर आणण्यात महत्वाची भूमिका देखील बजावली. बंकिमचंद्र चटर्जी यांची प्रेम कथेवर आधारित बंगाली भाषेतील पहिली कादंबरी ‘दुर्गेशनंदिनी’ सन १८६५ साली प्रकाशित झाली होती. तसचं, सन १८६६ साली त्यांच्याद्वारे लिहिण्यात आलेल्या कपालकुंडला रचनेची मोठया प्रमाणात प्रशंसा करण्यात आली होती.

या रचनेपासूनच ते एक प्रसिद्ध लेखक म्हणून ओळखले जाऊ लागले. बंकिमचंद्र चटर्जी यांनी ऐतिहासिक संदर्भात सर्वात पहिले सन १८६९ साली “मृणालिनी” नावाची कादंबरी लहिली. यानंतर, बंकिमचंद्र चटर्जी यांनी सन १८७२ साली आपले ‘बांगदर्शन’ नावाचे मासिक पत्रिकेचे प्रकाशन सुरु केले होते. त्यांचे हे मासिक पत्रिका चार वर्षांपर्यंत प्रकाशित होत राहिले.

याव्यतिरिक्त, सन १८७३ साली त्यांनी विषवृक्ष, सन १८७७ साली ‘चंद्रशेखर’, सन १८८१ साली राजसिंग, सन १८८२ साली त्यांनी “आनंदमठ” कादंबरी लिहिली होती. बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या “आनंदमठ” नावाच्या कादंबरी मधून भारताचे प्रसिद्ध राष्ट्रगीत “वंदेमातरम्” घेण्यात आले आहे.

या गीताची लोकप्रियता इतकी होती की या गीताचे गायन स्वत: गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर यांनी केलं होतं. याशिवाय बंकिमचंद्र चटर्जी यांनी देवी चौधराणी, “सीताराम”, ‘कमला कांतेर दप्तर’, ‘कृष्ण कांतेर विल’, ‘विज्ञान रहस्य’, ‘लोकरहस्य’, ‘धर्मतत्व’ अश्या प्रकारच्या अनेक ग्रंथाची त्यांनी रचना केली होती.

• १८९४: वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक आणि सुधारक बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांचे निधन. (जन्म: २७ जून १८३८)

  • घटना :

१८३८: द ग्रेट वेस्टर्न हे वाफेचे इंजिन असलेले जहाज इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथून निघून पंधरा दिवसांनी न्यूयॉर्क येथे पोचले. अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिली आगबोट.
१९११: डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा शोध लावला.
१९२१: आचार्य विनोबा भावे यांनी ‘पवनार’ आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली.
१९२९: भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.
१९५०: भारत आणि पाकिस्तान मध्ये लयाकत-नेहरु करार झाला.
१९९३: मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रात सामील झाले
२००५: पोप जॉन पॉल (दुसरे) यांच्या अंत्ययात्रेत अंदाजे ४० लाख लोक सहभागी झाले.

• मृत्यू :
• १८५७ : १८५७ च्या बंडातील स्वातंत्र्यवीर मंगल पांडे हे देशासाठी हुतात्मा झाले ( फाशीच्या शिक्षेने मृत्यू.) (जन्म: १९ जुलै, १८२७)
• १९५३: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर , १८८२)
• १९७४: मराठी रंगभूमीवरील कलाकार नानासाहेब फाटक यांचे निधन. (जन्म: २४ जून १८९९)
• २०१५: भारतीय पत्रकार आणि लेखक जयकानधन यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल, १९३४)

  • जन्म :
    १९२४: ‘पद्मविभूषण’ पुरस्कार सन्मानित शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी , १९९२)
    १९२८: नामवंत मराठी साहित्यिक, स्वामीकार रणजित देसाई यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च , १९९२)
    १९७९: भारतीय गायक-गीतकार अमित त्रिवेदी यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »