‘कर्मयोगी’चे संस्थापक संचालक बलभीम काळे यांचे निधन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

इंदापूर : कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक श्री. बलभीम अर्जुन काळे ऊर्फ तात्या (वय ८०) यांचे ६ जून रोजी सकाळी ९.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

माजी खा. दिवंगत शंकरराव पाटील यांच्याबरोबर बलभीम काळे हे इंदापूर तालुक्यात सामाजिक व राजकीय कामात अग्रेसर होते. अगोती नं. २ ग्रामपंचायतीचे प्रथम सरपंच होण्याचा मान त्यांनी मिळवला होता. कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असून, स्थापनेपासून सलग १५ वर्षे कारखाना संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक सुभाष काळे यांचे ते वडील होत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »