नवे साखर आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सूत्रे स्वीकारली

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : नवे साखर आयुक्त म्हणून डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ६ जून रोजी पदाची सूत्रे स्वीकारली. साखर संचालक, सहसंचालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

डॉ. पुलकुंडवार हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००८ च्या बॅचचे आहेत. महसूल, भूमी अधिग्रहण आणि मंत्रालयातील प्रशासकीय कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. ते काही काळ तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे खासगी सचिव म्हणून कार्यरत होते. साखर आयुक्तालयात त्यांनी पदाची सूत्रे हाती घेताच त्यांचे साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी, सहसंचालक (उपपदार्थ) संतोष पाटील व राजेश सुरवसे (अर्थ) आदींनी स्वागत केले.

यापूर्वी डॉ. पुलकुंडवार नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त होते. निवृत्त साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या निवृत्तीमुळे हे पद रिक्त झाले होते. सरकारने हे पद फार काळ रिक्त ठेवले नाही.
जुन्या साखर आयुक्तांच्या काळात भरीव काम झाल्याने , नवे साखर आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »