बलरामपूर चिनी मिल्सच्या उत्पादनात घट

नवी दिल्ली : २०२४-२५ साखर हंगामात एकूण ९९.१६ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आले, जो मागील हंगाम २०२३-२४ मधील १००.९१ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाच्या तुलनेत १.७३% नी कमी आहे, असे बलरामपूर चीनी मिल्सने जाहीर केले आहे. देशातील सर्वात मोठ्या कारखान्यांपैकी हा एक कारखाना आहे.
शुद्ध साखरेचे उत्पादन ९.२४ लाख मेट्रिक टन झाले असून, यामध्ये वर्षभरातील तुलनात्मक घसरण १२.५% इतकी आहे. ऊसाचा ज्यूस इथेनॉल उत्पादनासाठी वळविल्यामुळे साखर उताऱ्यावर १.९६% परिणाम झाला. यामुळे एकूण १.९४ लाख मेट्रिक टन साखरेची घट झाली आहे.
बलरामपूर चीनी मिल्स ही भारतातील सर्वात मोठ्या साखर उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. ऊसापासून मिळणाऱ्या उपपदार्थ मोलॅसेसपासून इथेनॉल तयार करणे आणि बगॅससपासून सह-वीज उत्पादनाच्या माध्यमातून वीज निर्मितीही कंपनी करते.