भगवान महावीर जयंती

आज गुरुवार, एप्रिल १०, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र २०, शके १९४७
सूर्योदय : ०६:२५ सूर्यास्त : १८:५५
चंद्रोदय : १६:५४ चंद्रास्त : ०५:१८, एप्रिल ११
शक सम्वत : १९४७ विश्वावसु
चंद्र माह : चैत्र
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : त्रयोदशी – ०१:००, एप्रिल ११ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी – १२:२४ पर्यंत
योग : वृद्धि – १८:५९ पर्यंत
करण : कौलव – ११:५५ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – ०१:००, एप्रिल ११ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : सिंह – १९:०४ पर्यंत
राहुकाल : १४:१४ ते १५:४७
गुलिक काल : ०९:३२ ते ११:०६
यमगण्ड : ०६:२५ ते ०७:५९
अभिजितमुहूर्त : १२:१५ ते १३:०५
दुर्मुहूर्त : १०:३५ ते ११:२५
दुर्मुहूर्त : १५:३५ ते १६:२५
वर्ज्य : २०:२६ ते २२:१३
जैन धर्मातील चोवीस तीर्थंकरांपैकी अखेरचे तीर्थंकर. महावीरांच्या आधी जैन धर्माचे २३ तीर्थंकर होऊन गेले, असे जैन धर्माचे अनुयायी मानतात आणि त्यामुळे महावीर हे जैन धर्माचे संस्थापक ठरत नाहीत परंतु जैन धर्माला प्रभावशाली बनविण्याचे फार मोठे श्रेय महावीरांकडे जात असल्यामुळे जगातील प्रमुख धर्मसंस्थापकांच्या मालिकेतील गौतम बुद्ध वगैरेंच्या बरोबरीने त्यांचे नाव घेतले जाते.
तत्कालीन राजपुत्रांना मिळणारे सर्व प्रकारचे शिक्षण महावीरांनाही मिळाले होते परंतु त्यांचे मन गृहस्थधर्मामध्ये रमले नाही आणि त्यांनी गृहत्याग केला. नंतरची १२ वर्षे त्यांनी खडतर तप केले. प्रारंभीच्या एका वर्षानंतर त्यांनी वस्त्राचाही त्याग केला. दंश करणाऱ्या कीटकांचीही त्यांनी हत्या केली नाही. अज्ञानी लोकांनी या काळात त्यांचा खूप छळ केला पण त्यांनी तो शांतपणे सोसला. अखेरीस वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर मृत्यूपर्यंत म्हणजेच पुढची तीस वर्षे ते धर्मोपदेश करीत राहिले.
महावीरांचे चरित्र म्हणजे साधुचरित्राचा प्रथम आदर्श, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हटले आहे. तितिक्षा, क्षमा, अहिंसा, समता, त्याग इ. गुणांची परमावधी महावीरांच्या ठिकाणी झाली होती, असे ते म्हणतात. स्वाभाविकच, भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील मोजक्या महापुरुषांमध्ये महावीरांचा अंतर्भाव होतो.
आज भगवान महावीर वर्धमान जयंती आहे.
आज जागतिक होमिओपॅथी दिन आहे.
आज विश्व भावंड दिन आहे.
• १९९५: भारताचे ४थे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे निधन. (जन्म: २९ फेब्रुवारी १८९६)
• अवघा रंग एक झाला ।
रंगि रंगला श्रीरंग ॥१॥
मी तूंपण गेले वायां ।
पाहतां पंढरीच्या राया॥२॥
१९३१: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित शास्त्रीय गायिका ‘गानसरस्वती’ किशोरी आमोणकर यांचा जन्म. ( मृत्यू: एप्रिल ३, २०१७)
पुरावनस्पती शास्त्रज्ञ डॉ . बिरबल साहनी : बिरबल यांचा जन्म पाकिस्तानातील भेरा या गावी झाला व शिक्षण लाहोरला झाले. बिरबल साहानी यांचे वडिलही रसायनशानशास्त्रज्ञ होते तसेच ते समाज सुधारक व देशभक्तही होते. त्यांच्या वडिलांना ब्रिटिश सरकारनी ‘ रावबहादूर ‘ ही पदवी दिली होती. बिरबल यांची आई धार्मिक वृत्तीची होती . पण मुलांनी उत्तम शिक्षण घेण्यासाठी परदेशी जावे अशी तिची इच्छा होती .
बिरबलाला नेतृत्व , साहस व निष्पक्षपातीपणा हे गुण वडिलांकडून मिळाले. मुलांच्या भांडणातील न्यायनिवाडा ते करीत . साहसीपणामुळे ते दऱ्याखोऱ्यात फिरत असत . यामुळेच वनस्पतीशास्त्र व जीवाश्म यांच्याबद्दल त्यांना अभ्यासाची गोडी लागली .
त्यांना अफाट स्मरणशक्ती लाभली होती. त्याच्या जीवावर त्यांनी अनेक पदव्या मिळविल्या . त्यांनी बी.एस्सी. नंतर उच्च शिक्षणासाठी केंब्रीजला प्रयाण केले. तेथे त्यांनी नैसर्गिकशास्त्राची बी.ए. पदवी १९१४ मिळवली व १९१५ साली दोन शोधनिबंध प्रसिद्ध केले . त्यांना १९१९ साली लंडनची व १९२९ साली केंब्रिज विद्यापीठाची अशी दोनदा पी.एच.डी. पदवी मिळाली . मात्र त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग भारतीयांसाठी करण्याचे ठरविले . त्यांना अनेक विद्यापीठांची पी. एच . डी . मिळाली.
त्यांनी बनारस व लाहोर विद्यापीठात वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सुरुवात केली. तेथे नवनवीन प्रयोग केले. लखनौ विद्यापीठाचा वनस्पतीशास्त्र विभाग त्यांनी इतका सुधारला की परदेशी विद्यार्थी भारतात शिकायला येऊ लागले. ज्येष्ठ शिक्षकांनी नेहमी खालचे वर्ग शिकविण्यासाठी त्यांचा आग्रह असे. त्यांचे जर्मन व फ्रेंच भाषावरही प्रभुत्व होते. प्राचीन भारतातील नाणी तयार करण्याचे तंत्र यावर संशोधन करून उपयुक्त लेख लिहिला त्याबद्दल त्यांना नेल्सन राईट पारितोषिक मिळाले . जीवशास्त्रातील लोकोत्तर संशोधनासाठी बर्कले पुरस्कार मिळाला . डॉ . रामन् यांनी त्यांना ‘ चैतन्यमूर्ती ‘ म्हणले आहे.
• १९४९ : पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी यांचे निधन ( जन्म : १४ नोव्हेंबर, १८९१ )
भारतीय संपादक , पत्रकार, उदारमतवादी राजकारणी आणि संसदपटू सर चिररावूरी यज्ञेश्वरा चिंतामणी. – त्यांचा जन्म तेलुगू नववर्षाच्या दिवशी (उगदी) विजयनगरम , आंध्र प्रदेश , भारत येथे झाला .
प्रख्यात भारतीय राजकारणी श्री व्ही.एस. श्रीनिवास शास्त्री यांनी त्यांना “भारतीय पत्रकारितेचे पोप” म्हटले होते .
१८ व्या वर्षी ते विझाग स्पेक्टेटर या वृत्तपत्राचे संपादक झाले . त्यावेळी त्यांनी कागद विकत घेतला आणि त्याचे नाव इंडियन हेराल्ड ठेवले . त्यांनी जी सुब्रमणिया अय्यर यांच्या संपादनाखाली मद्रास स्टँडर्डमध्ये काम केले .
१९०९ ते १९३४ दरम्यान ते अलाहाबादस्थित द लीडरचे मुख्य संपादक होते. संपादक म्हणून स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून संचालक मंडळाचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू यांच्याशी त्यांचा संघर्ष म्हणजे मोतीलाल एका वर्षाच्या आत, त्यानंतर १९२७ ते १९३६ दरम्यान निघून गेले. , चिंतामणी हे केवळ वृत्तपत्राचे मुख्य संपादक नव्हते तर उत्तर प्रदेश विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेही होते .
चिंतामणी यांची ब्रिटिश भारतातील संयुक्त प्रांतांचे शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती भारत सरकार कायदा 1919 च्या राजसत्ता योजनेचा एक भाग म्हणून करण्यात आली होती . 1930-1931 मध्ये लंडन येथे पहिल्या गोलमेज परिषदेसाठी त्यांना प्रतिनिधी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
महात्मा गांधी आणि ब्रिटीश प्रशासक आणि भारतीय लोक त्यांच्या संपादकीयांमुळे खूप प्रेरित झाले. 1939 च्या बर्थडे ऑनर्स यादीत त्यांना नाइट देण्यात आले; 20 सप्टेंबर रोजी जॉर्ज सहावा यांनी त्यांना नाइटहुड प्रदान केला.
१८८०: वृत्तपत्रकार तसेच उत्तर प्रदेशचे शिक्षणमंत्री सर सी. वाय. चिंतामणी यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै, १९४१)
- घटना :
१९१२: इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातून टायटॅनिक जहाजाने पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरवात केली.
१९५५: योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.
१९७०: पॉल मेकार्टनीने व्यक्तिगत आणि व्यावसायिक कारणास्तव द बीटल्स सोडण्याचे जाहीर केले.
• मृत्यू :
• १३१७: संत गोरा कुंभार समाधिस्थ झाले. ( तारखेनुर )
• १९३७: ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १८८४ – रायपूर, मध्य प्रदेश)
• १९६५: स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर, १८९८)
• २०००: संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै, १९१८)
- जन्म :
१८४३: विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र गुंजीकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून , १९०१)
१८९४: बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक घनश्यामदास बिर्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९८३)
१८९७: भारतीय लेखापाल आणि राजकारणी प्रफुल्लचंद्र सेन यांचा जन्म. (मृत्यू: २५ सप्टेंबर १९९०)
१९०१: अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९७१)
१९०७: नाटककार, चित्रपट दिग्दर्शक आणि पत्रकार मो. ग. रांगणेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी, १९९५)
१९१७: भारतीय राजकारणी जगजितसिंह लयलपुरी यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे , २०१३)
१९५२: भारतीय राजकारणी नारायण राणे यांचा जन्म.
१९७५: भारतीय नर्तक आणि कोरिओग्राफर टेरेंस लुईस यांचा जन्म.