श्री विघ्नहरचे एमडी भास्कर घुले यांची DSTA च्या नियामक परिषदेवर निवड

आवडल्यास ही बातमी शेअर करा

डेक्कन शुगर टेक्नोलॅाजीस्टस असोसिएशनच्या नियामक परिषदेवर श्री भास्कर घुले यांची बिनविरोध निवड

साखर आणि उपपदार्थ उद्योगातील अनुभवी व्यक्तीमत्त्व व श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांची डेक्कन शुगर टेक्नोलॅाजीस्टस असोसिएशनच्या (DSTA) नियामक परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.

निवडीनंतर भास्कर घुले म्हणाले, “DSTA चे ध्येय पुढे नेण्यासाठी, म्हणजे नवीन साखर तंत्रज्ञान आणि चांगल्या उत्पादन पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे.”


साखर उद्योगातील चाळीस वर्षाची यशस्वी कारकीर्द
व विघ्नहर सहकारी साखर कारखान्यात कार्यकारी संचालक म्हणून काम केल्याचा घुले यांना खूप मोठा अनुभव आहे. त्यांच्या काळात त्यांनी कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर यांचे मार्गदर्शनानुसार इथेनॉल प्रकल्प व साखर कारखाना विस्तारीकरण करून कारखान्याची क्षमता वाढविली आधुनिक तंत्रज्ञान वापरले आणि कामकाजात सुधारणा केल्या.कारखान्याचे विस्तारीकरण अतिशय कमी दिवसांत म्हणजेच पन्नास (50)पुर्ण केले.व चाचणी गळीत हंगामात 9 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले.
डेक्कन शुगर टेक्नोलॅाजीस्टस असोसिएशन ही साखर उद्योगात तांत्रिक ज्ञान आणि व्यावसायिक विकासाला चालना देण्यासाठी काम करणारी संस्था आहे.

महाराष्ट्रातील साखर उद्योग आपल्या ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. सध्या या क्षेत्रातील प्रगती साठी तांत्रिक प्रगतीवर जास्त भर दिला जात असल्यामुळे, भास्कर घुले यांच्यासारखे उद्योगातील तज्ञ या क्षेत्राला नवीन तंत्रज्ञानाचा साखर उद्योगात स्वीकारण्यात येणाऱ्या अडचणीबाबत निश्चितच मार्ग दाखवतील अशी आहे
श्री. घुले यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »